शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

SSC Result : अकोल्याच्या मुलीच हुश्शार..जिल्ह्याचा निकाल ९५.५२ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 1:20 PM

कोरोना संकटाच्या पृष्ठभूमीवर जाहीर झालेल्या या निकालात अकोला जिल्ह्याचा निकाल ९५.५२ .टक्के लागला आहे.

अकोला : राज्य शिक्षण मंडळाद्वारे अमरावती विभागाअंतर्गत मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक इयत्ता दहावीच्या परीक्षेचा आॅनलाइन निकाल बुधवार, २९ जुलै रोजी आॅनलाईन जाहीर करण्यात आला असून, दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलींनीच बाजी मारली आहे. कोरोना संकटाच्या पृष्ठभूमीवर जाहीर झालेल्या या निकालात अकोला जिल्ह्याचा निकाल ९५.५२ .टक्के लागला आहे.  बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातदेखील मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९७.२३ टक्के, तर मुलांचा निकाल ९३.९९  टक्के लागला आहे. अमरावती विभागातील निकालात जिल्हा तिसºया  क्रमांकावर आहे.   मार्चमध्ये झालेल्या दहावी परीक्षेसाठी जिल्ह्यात ११९ परीक्षा केंद्रं होती.  जिल्ह्यात एकूण २७०९१ नोंदणीकृत परीक्षार्थी होते. त्यापैकी २६९३३  विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस बसले होते. त्यापैकी  ८९३८  विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीत , ९०९९  विद्यार्थी प्रथम श्रेणीत,  ६२४५ द्वितीय श्रेणीत, तर   १५५४ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण २५७२७  विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी झाले आहेत. जिल्ह्यात बारावीच्या निकालातही मुलीच अव्वल ठरल्या होत्या. दहावीच्या निकालाने विद्यार्थ्यांच्या स्वप्नांच्या पंखांना नवे बळ मिळाले आहे.

पातूर तालुका अव्वलजिल्ह्यात पातूर तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९७.१७ टक्के लागला आहे. त्यानंतर मुर्तीजापूर - ९६.८५ टक्के, बार्शीटाकळी - ९६.१३ टक्के, अकोला ९५.६८ टक्के, अकोट - ९४.८६ टक्के, बाळापूर - ९४.६८ टक्के व तेल्हारा ९३.६५ टक्के असा क्रम आहे.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालAkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र