शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

अकोटच्या अंध धनश्रीचे नेत्रदीपक यश

By admin | Updated: June 14, 2017 00:16 IST

दहावीच्या परीक्षेत डोळस विद्यार्थ्यांमधून ९५ टक्के गुण

विजय शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : सुर्योदय आणि सूर्यास्त कधी पाहिला नाही अशा दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या अकोटच्या धनश्री हागे या मुलीने शिक्षणात मात्र इंद्रधनुष्याचे रंगाची उधळण करीत नेत्रदीपक यश मिळविले आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत डोळस शाळेत शिकत तिने दहावीच्याच्या परीक्षेत ९५ टक्के गुण प्राप्त केले. जिद्द, संघर्षाने डोळे नसतांनाही संपूर्ण राज्यात तिने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. अकोट येथील जलतारे प्लॉट येथील सोनल व अशोक हागे यांची मुलगी धनश्री ही जन्मतच अंध आहे. धनश्रीच्या दोन्ही डोळ्यात रेटीना बनलेला नसल्याने तिच्यावर कोणताही उपचार करुन जग पाहता आले नाही, मात्र तिच्या संवेदनेने अलौकिकतेचे दर्शन घडावे असे कृर्तत्व घडविले आहे. आई-वडिलांच्या सहकार्याने धनश्री पहिल्या वर्गापासूनच सर्वसामान्य डोळस विद्यार्थ्यांसोबत शिकून प्रथम येत गेली. अकोट येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कोणत्याही अंध विद्यालयात व ब्रेल लिपीच्या माध्यमातून न जाता स्थानिक नरसिंग विद्यालयामध्ये आठव्या वर्गात प्रवेश घेतला. कुठल्याही प्रकारचा कमीपणा न वाटू देता तिने वर्षभर जिद्दीने अभ्यास केला. दहावीच्या परीक्षेत तिने लेखनिक घेऊन सर्व पेपर सोडविले. त्यामध्ये तिला ९४.८० टक्के असे घवघवीत यश मिळाले आहे. तिला सामाजिक शास्त्र विषयात १०० पैकी १०० गुण आहेत. एकुण ५०० पैकी ४७४ गुण प्राप्त केले आहेत. दहावीच्या अभ्यासक्रमाच्या रेकॉर्डींग सिडी ऐकून नंतर पाठांतर करुन घेण्याकरिता आई-वडिलांनी मेहनत घेतली. दररोज तीन तास अभ्यास करुन घेणे, शाळेत सोडणे, आणणे आदींसह तिला सर्वतोपरीने मदत करीत गेल्याने मला कधीही आपण अंध असल्याचा आभास झालास नसल्याचे धनश्रीने सांगितले. तिला शिक्षकांनी सुध्दा चांगले मार्गदर्शन केले. धनश्री संगित विशारद मध्ये गायनाच्या माध्यम पूर्ण परीक्षेस बसली आहे. तिला गायन, संगित व नृत्याची आवड आहे. अतिशय बोलकी असल्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत शिकत असतांना, वावरत असतांना तिला कधी आपण अंध असल्याचे जाणवले नाही.धनश्रीला व्हायचंय जिल्हाधिकारी दोन्ही डोळ्यांनी अंध असली तरी माझा आत्मविश्वास डोळस आहे. कला विभागात प्रवेश घेऊन मला युपीएससी करुन जिल्हाधिकारी व्हायचं आहे. माझ्याच सारख्या अनेक अंध मुली व समाजाची सेवा करायची आहे. माझ्या यशाकरिता आई, वडील व शिक्षकांनी प्रेरणा दिल्याने आपण हे यश संपादीत केले आहे. जगात अशक्य काहीही नाही मनात ध्यास जर घेतला तर आपले ध्येय निश्चितच गाठता येते असा संदेश धनश्रीने लोकमतशी बोलतांना दिला.