शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

‘सोल्युलिबिलीटी कीटस’विनाच राबविला सिकलसेल सप्ताह

By admin | Updated: December 25, 2014 00:59 IST

राज्यात कुठेच पुरवठा नाही, वेळेवर राबविलेल्या कार्यक्रमाचा परिणाम.

सचिन राऊत / अकोला - राज्य सरकारने ११ ते १७ डिसेंबर या कालावधीत राज्यातील २0 जिल्ह्यामध्ये सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम राबविला, मात्र यासाठी सर्वात महत्वाचा घटक असलेला बफर सोल्यूशनचा पुरवठाच झाला नसल्याने या कार्यक्रमाचा बट्टयाबोळ झाला आहे. राज्यातील अकोला, ठाणे, नाशिक, नंदुरबार, अमरावती, गोंदीया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, धुळे, जळगाव, बुलडाणा, वाशिम, नांदेड, औरंगाबाद, रायगड आणि हिंगोली या २0 जिल्हयामध्ये ११ ते १७ डिसेंबर या कालावधीत सिकलसेल नियंत्रण सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहामध्ये सिकलसेल रुग्णांच्या तपासणीसाठी आवश्यक असणार्‍या सोल्युबिलीटी टेस्ट कीटस सिकलसेल नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा कार्यालयाक डे कार्यक्रम संपल्यावरही उपलब्ध झाल्या नसल्याने सर्वच ठिकाणी हा कार्यक्रम अडचणीत आला आहे. सोल्युबिलीटी टेस्ट कीटस पाठविने शासनाने बंद केले असून त्यावर तोडगा म्हणूण बफर सोल्यूशनव्दारे या चाचण्या करण्यास आरोग्य विभागाला सांगितले आहे. याबाबत शासनाने शासकीय वैैद्यकीय महाविद्यालयांना ६ डिसेंबर रोजी पत्र पाठवून बफर सोल्यूशनची निर्मिती करण्याचे आदेश दिले होते. मात्र एवढय़ा कमी वेळेत बफर सोल्यूशनची निर्मिती करणे कठीण असल्याने वैद्यकीय महाविद्यालयांनी बफर सोल्यूशनचा पुरवठा जिल्हा परिषद आरोग्य विभागाला केला नाही. या कारणामूळे सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम बारगळला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला बफर सोल्यूशनसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे धाव घ्यावी लागत आहे. मात्र वैद्यकीय महाविद्यालयांनाही र्मयादा आल्याने त्यांच्याकडून हा पुरवठा करण्यात येत नसून परिणामी हा कार्यक्रमच प्रभावीत झाला आहे. ऐन वेळेवर नियोजन करुन कार्यक्रम राबविल्याने हा परिणाम झाला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.