शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत घर बेचिराख, सैनिकाने वाचवले वृद्ध  दाम्पत्याचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 11:56 AM2021-04-06T11:56:11+5:302021-04-06T11:56:35+5:30

Soldier rescues elderly couple from fire : सुरेश बळीराम इंगळे व त्यांचा मित्र रतन इंगळे यांनी तातडीने वृद्ध कुटुंब आणि बकऱ्यांचे प्राण वाचवले; मात्र घर जळून बेचिराख झाले.

Soldier rescues elderly couple from fire in short circuit | शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत घर बेचिराख, सैनिकाने वाचवले वृद्ध  दाम्पत्याचे प्राण

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत घर बेचिराख, सैनिकाने वाचवले वृद्ध  दाम्पत्याचे प्राण

Next

शिर्ला : अकोला -पातुर महामार्गावरील सोळा मैल वस्तीतील वृद्ध कुटुंब राहत असलेल्या असलेल्या घराला मध्यरात्री एक वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, आगीने रुद्र रूप धारण करण्यापूर्वी सैनिक सुरेश बळीराम इंगळे व त्यांचा मित्र रतन इंगळे यांनी तातडीने वृद्ध कुटुंब आणि बकऱ्यांचे प्राण वाचवले; मात्र घर जळून बेचिराख झाले.
शिर्ला ग्रामपंचायत हद्दीतील अकोला पातुर महामार्गावरील सोळा मैल वस्तीमध्ये सटवाजी रामचंद्र बळकारर  जनाबाई सटवाजी बळकार राहतात.
अकोला येथून शिर्ला येथे वडिलांना दहावी सोडण्यासाठी सैनिक सुरेश बळीराम इंगळे आणि यांचा मित्र रतन इंगळे येत असताना शॉर्टसर्किट मुळे घर जळत असल्याचे त्यांच्या दृष्टीपथास पडले तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करता करता जळत्या घरातील वृद्ध कुटुंब आणि बकऱ्या यांचे प्राण वाचवण्यासाठी घरामागील भिंत तोडली.सर्वाना जळत्या घरातुन बाहेर काढले. त्यांचा जीव वाचवला त्यानंतर महामार्गाचे काम चालू असलेल्या टँकरला तेथे आणून घराची आग विझवली.  जनाबाई सटवाजी बळकार यांचा आगीत हात भाजला.
आगी मुळे सटवाजी रामचंद्र बळकार यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या.  निराधार कुटुंबाला पुढील वर्षभर रहाव कुठे जगावं कसं हा प्रश्न पडला आहे.  

Web Title: Soldier rescues elderly couple from fire in short circuit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.