शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राची बंदी असतानाही मातीच्या वीटभट्ट्या सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 12:25 IST

महसूल आणि पर्यावरण विभागाकडून कारवाई होत नसल्याने वीटभट्ट्या बिनबोभाटपणे चालवल्या जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोळसा व लिग्नाइटवर चालणाऱ्या औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या ३०० किमी परिघात भूपृष्ठावरील मातीचे उत्खनन थांबवण्यासाठी मातीच्या विटांची निर्मिती बंद करण्याचा केंद्र शासनाचा आदेश असतानासंपूर्ण राज्यासह अमरावती विभागात सर्रासपणे वीटभट्ट्यांतून उत्पादन सुरू आहे. याप्रकरणी महसूल आणि पर्यावरण विभागाकडून कारवाई होत नसल्याने वीटभट्ट्या बिनबोभाटपणे चालवल्या जात आहेत.केंद्र शासनाने पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ नुसार सप्टेंबर १९९९ मध्ये लाल विटांच्या निर्मितीसाठी भूपृष्ठावरील मातीचे उत्त्खनन करण्यास प्रतिबंध करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये मातीचे उत्खनन रोखण्यासाठी कोळसा किंवा लिग्नाइटवर आधारित औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणारी फ्लाय अ‍ॅश वापरण्याचे बंधन घातले होते. त्या अधिसूचनेमध्ये संशोधन आणि अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन, जलवायू परिवर्तन मंत्रालयाने २५ फेब्रुवारी २०१९ रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यावर ६० दिवसात संबंधितांकडून आक्षेपही मागवण्यात आले. आक्षेपानंतर पर्यावरण मंत्रालयाने अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याचेही निर्देश दिले; मात्र त्या अधिसूचनेची अनेक राज्यात अंमलबजावणी सुरूच झालेली नाही. त्यामुळे मातीपासून वीटभट्ट्या निर्मितीचा धंदा राजरोसपणे जोरात सुरू आहे. राज्यात सर्वत्रच ही परिस्थिती असताना अमरावती विभागातही तोच प्रकार घडत आहे.अमरावती विभागात पारस, नागपूर विभागात कोराडी, मौदा, चंद्रपूर येथे औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहेत. या सर्वच वीजनिर्मिती केंद्रांच्या ३०० किमी परिघात संपूर्ण विदर्भाचा विस्तार आहे. तरीही त्या केंद्रातून निघणाºया फ्लाय अ‍ॅशऐवजी मातीचे उत्खनन करून विटांची निर्मिती धडाक्यात सुरूच आहे. त्याकडे केंद्रीय पर्यावरण, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही दुर्लक्ष केले जात आहे. तर माती उत्खननाला प्रतिबंध करणाºया महसूल विभागाकडूनही कारवाईला बगल दिली जात आहे. परिणामी, पर्यावरणासाठी घातक ठरणाºया वीटभट्ट्या सुरूच आहेत.

वीटभट्टीमालकांचा विरोधदरम्यान, केंद्र शासनाची ही अधिसूचना रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरातील वीटभट्टीचालकांनी १० डिसेंबर रोजी दिल्ली येथे धरणे आंदोलनही केले आहे.

केंद्र शासनाच्या अधिसूचनेसंदर्भात महसूल आणि पर्यावरण विभागाने केलेल्या उपाययोजना व प्रतिबंधात्मक कार्यवाहीचा आढावा घेतला जाईल, तसेच परिणामकारक अंमलबजावणीसाठी तातडीने निर्देश दिले जातील.- प्रा. संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाenvironmentपर्यावरण