शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

कृषीपूरक व्यवसायासाठी कौशल्य विकास कार्यक्रम

By admin | Updated: February 28, 2015 00:43 IST

शेतक-यांना प्रोत्साहन; ३३ जिल्ह्यात अंमलबजावणी.

खामगाव (बुलडाणा): शेतीची उत्पादकता वाढवून शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी राज्यातील ३३ जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची अंमलबजावणीसाठी आत्मा संचालक तथा कृषी नोडल अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. कृषीपूरक व्यवसाय करण्यासाठी शेतकर्‍यांना यातून प्रोत्साहन मिळणार आहे.शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढण्यासाठी विदर्भ विकास कार्यक्रम कृषी पुरक व्यवसायासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये २0११-१२ या वर्षात राबविण्यात आला होता. या उपक्रमाची यशस्विता पाहता, २0१२-१३ या वर्षात हा कार्यक्रम ३३ जिल्ह्यात राबविण्यात आला होता. आता हाच कार्यक्रम २0१४-१५ या वर्षातही राबविण्यात येणार आहे. यासाठी ५0 लक्ष रुपयांची तरतूद शासनाने केली आहे. कृषीपुरक व्यवसायासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी ७.५0 लक्ष रूपयांच्या निधीस शासनाची मान्यता मिळाली आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि वसंतराव नाईक राज्य कृषी व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था नागपूर यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे. संबंधित विद्यापीठाकडील कृषी विज्ञान केंद्र, स्वयंसेवी संस्थाकडील प्रशिक्षण केंद्र, कृषी चिकीत्सालये, त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकांकडील प्रशिक्षण केंद्र व संलग्न विभागाकडील प्रशिक्षण केंद्रावर कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सन २0१४-१५ या वर्षात राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये राबविण्यास २४ फेब्रुवारी रोजी शासन मान्यता देण्यात आली आहे.