शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

तळीरामांना आता देशी दारू दुकानात बसून पिण्यास बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 3:33 PM

अकोला : तळीरामांना आता देशी दारू दुकानात पिण्यास बंदी घातली जाणार आहे. तसे विधेयक येत असून, उत्पादन शुल्क विभागाने आता मद्यपी आणि विक्रेत्यांकडून या संदर्भात सूचना मागितल्या आहेत.

ठळक मुद्देदेशी दारू दुकानात आता ९० मिलीलीटरची बाटली आता बंद होणार आहे. ३० आणि ६० मिलीलीटरची दारू पाऊच पार्सल स्वरूपात येणार आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

अकोला : तळीरामांना आता देशी दारू दुकानात पिण्यास बंदी घातली जाणार आहे. तसे विधेयक येत असून, उत्पादन शुल्क विभागाने आता मद्यपी आणि विक्रेत्यांकडून या संदर्भात सूचना मागितल्या आहेत. दुकानातून दारू नेल्यास सामाजिक तंटे आणि वाद कमी होतील, असा जावई शोध काढला गेला असून, त्याची अंमलबजावणी लवकरच होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.देशी दारू दुकानात आता ९० मिलीलीटरची बाटली आता बंद होणार आहे. त्याठिकाणी ३० आणि ६० मिलीलीटरची दारू पाऊच पार्सल स्वरूपात येणार आहे, असे आदेश उत्पादन शुल्क विभागाकडून मिळाले आहेत. देशी दारू दुकानात मद्य पिण्यास बंदी घातल्यास तळीराम थेट घरी जातील आणि पाऊचमुळे प्रदूषण कमी होईल. पोलिसांचा ताणही कमी होईल, असा जावई शोध लावून ही नियमावली येत आहे. मद्य पार्सल नेण्यासाठी अधिकृतपणे परवाना दिला जाणार आहे. यासंदर्भात उत्पादन शुल्क विभागाने मागविलेल्या अभिप्रायात अधिकाऱ्यांनी आणि मद्यविक्रेत्यांनी या नवीन नियमावलीस विरोध दर्शविला आहे. मात्र, शासन आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे बोलले जात आहे.देशी दारू दुकानात आजघडीला चकना आदी सेवा अत्यल्प दरात मिळते. मात्र, भविष्यात ही नियमावली आल्यास चकना विकणे दारू दुकानात बंद होईल. त्यानंतर पार्सल घेतल्यानंतर तळीराम कोठे बसतील याचा नेम नाही. चकना मिळविण्यासाठी कुठे जातील, हे सांगता येत नाही. देशी पार्सलची विक्री सुरू झाल्यास तळीराम भररस्त्यावर, मैदानात आणि सार्वजनिक ठिकाणी बसणार नाही, हे कशावरून, असा प्रश्नही आता मद्यविक्री करणाºया दुकानदारांकडून उपस्थित होत आहे. उलटपक्षी त्यांचे अधिकृत ठिकाण हिरावल्या जाऊन ते भररस्त्यावर येतील, अशी शक्यता आहे. या नियमावली संदर्भात शासनाने फेरविचार करावा, अशी मागणीही आता समोर येत आहे. मात्र, शासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग