अकोला : सिंधी कॅम्प मधील लॅपटॉपच्या शोरूम मालक व सहकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक छळ व धमक्यांना कंटाळून तरुणाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी खदान पोलिस ठाण्यात शोरुम मालकासह दोघांविरुद्ध खदान पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृताचे नाव प्रवज गोपाळराव शिरसाट (४०), रा. अंबिका रेसीडेंसी, मलकापूर) असे आहे. त्यांची पत्नी पूनम शिरसाट यांनी या प्रकरणी तक्रार दिली.
तक्रारीनुसार, शोरुम मालक राजेश इंगळे (५५), रा. वाशिम) गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या पतीला अपमानास्पद वागणूक छळामुळे त्यांची मानसिकता ढासळली होती. त्यामुळे शिरसाट यांनी १५ सप्टेंबर रोजी मलकापूर परिसरातील रेल्वे लाईनवर आत्महत्या केल्याचे म्हटले.