शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
3
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
4
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
5
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
6
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
7
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
8
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
9
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
10
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
11
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
12
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
13
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
14
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
15
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
16
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
17
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
18
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
19
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
20
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत वितरणाचा ‘शॉक’

By admin | Updated: May 11, 2014 22:03 IST

मोफत कृषीपंप जोडणीला

वाशिम: मोठा गाजावाजा करीत मागासवर्गीय शेतकर्‍यांना मोफत कृषीपंप जोडणी दिल्याचा डंका पिटणार्‍या यंत्रणेचे पितळ आता उघडे पडत आहे. दीर्घ कालावधीनंतरही जवळपास ७0 टक्के शेतकर्‍यांच्या विहिरीवर कृषीपंपाचे मीटर बसू शकले नसल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री विशेष कार्यक्रमातून जिल्ह्यातील १६५१ लाभार्थींची दीडवर्षांपूर्वीच जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत मोफत कृषीपंप जोडणीसाठी निवड करण्यात आली होती. मात्र, वीज वितरण कंपनीच्या वाशिम यंत्रणेकडून अजूनही १३८८ लाभार्थींना कृषीपंप जोडणी दिली नसल्याची माहिती आहे. दारिद्रय़रेषेखाली जीवन जगणार्‍या अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकर्‍यांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टिकोनातून १९८२ पासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष घटक योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत नवीन विहिरीसह विविध प्रकारच्या १४ ते १६ बाबींवर अनुदान दिले जाते. रोजगार हमी योजनेंतर्गत घेतलेल्या विहिरींजवळ मोफत कृषीपंप जोडणी बसविण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री सहायता योजनेतून कृषीपंप जोडणीची संकल्पना साकारली. या योजनेंतर्गत सुरूवातीला वाशिम जिल्ह्याला २३५ लाभार्थींचे उद्दिष्ट होते. मात्र, तत्कालिन कृषी सभापती रमेश शिंदे पाटील व कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी वरिष्ठांकडे पाठपुरावा करून १६५१ लाभार्थींपर्यंत उद्दिष्ट वाढवून आणले. फेब्रुवारी २0१३ मध्ये कृषीपंप जोडणीसाठी लाभार्थींची यादी वाशिमच्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे सादर करण्यात आली. आतापर्यंत केवळ २६३ लाभार्थींना वीजजोडणी देण्यात आली. दीड वर्षात केवळ २६३ लाभार्थींना विद्युत जोडणी देऊन विज वितरण कंपनीने एकप्रकारे शेतकर्‍यांची क्रुर थट्टाच केली असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आचारसंहिता शिथिल झाल्याने आणखी ४00 लाभार्थींंना कृषीपंप जोडणी देण्यात येणार होती. मात्र, त्याची कार्यवाही सुरू होणे बाकी आहे. थकित बिलापोटी वीजजोडणी कापणार्‍या वीज वितरण कंपनीने आपल्या कर्तव्यातही तेवढेच तत्पर असणे शेतकर्‍यांना अपेक्षीत आहे. कृषी विभागाने शुल्कापोटी लाखो रुपयांच्या भरणा वीज वितरण कंपनीच्या तिजोरीत केला आहे. असे असतानाही शेतकर्‍यांना कृषीपंप जोडणी मिळत नाही, ही खेदाची बाब आहे. शेतकर्‍यांच्या किरकोळ प्रश्नांवरून रान उठविणार्‍या संघटना व राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनीदेखील चुप्पी साधल्याने ह्यबेगडीपणह्ण चव्हाट्यावर आले आहे.