जावई व साळ्याने केले युवतीचे लैंगिक शोषण; बलात्काराचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 15:31 IST2018-11-19T15:29:28+5:302018-11-19T15:31:31+5:30

अकोला : जावई व साळ्याने संगनमताने एका १८ वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण केल्याची घटना सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. युवतीने रविवारी तक्रार दिल्यानंतर सिव्हिल लाइन पोलिसांनी साळा व जावयाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

 Sexual harassment of girl; rape case filed | जावई व साळ्याने केले युवतीचे लैंगिक शोषण; बलात्काराचा गुन्हा दाखल

जावई व साळ्याने केले युवतीचे लैंगिक शोषण; बलात्काराचा गुन्हा दाखल

ठळक मुद्दे नागेश चिमणकर अकोल्यात येत असल्यामुळे त्याची बहिणीच्या माध्यमातून पीडित युवतीशी ओळख झाली. नागेश चिमणकर याने युवतीवर बलात्कार केला, त्यानंतर युवतीचे अश्लील छायाचित्र काढून तिचे लैंगिक शोषण सुरू केले. युवतीचे अश्लील छायाचित्र नागेशकडे असल्याची माहिती त्याचा जावई नीलेश बोरकर यांना मिळाली.

अकोला : जावई व साळ्याने संगनमताने एका १८ वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण केल्याची घटना सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. युवतीने रविवारी तक्रार दिल्यानंतर सिव्हिल लाइन पोलिसांनी साळा व जावयाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. एका वकिलाने पक्षकार महिलेवरही अत्याचार केल्याचे प्रकरण शनिवारी घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एका युवतीवरील लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील खेर्डा येथील रहिवासी नागेश देवीदास चिमणकर याच्या बहिणीचा विवाह अकोल्यातील रहिवासी नीलेश शंकर बोरकर याच्याशी झाला होता. या विवाहानंतर नागेश चिमणकर अकोल्यात येत असल्यामुळे त्याची बहिणीच्या माध्यमातून पीडित युवतीशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. अशातच नागेशने पीडित युवतीला बहिणीच्या घरी कार्यक्रम असल्याचे सांगून बोलावले, त्यानंतर युवती नागेशच्या बहिणीच्या घरी आली असता तिथे कुणीही उपस्थित नव्हते. याचवेळी नागेश चिमणकर याने युवतीवर बलात्कार केला, त्यानंतर युवतीचे अश्लील छायाचित्र काढून तिचे लैंगिक शोषण सुरू केले.शेगाव येथे नेऊनही तिच्यावर बलात्कार केला. मोबाइलमध्ये असलेल्या अश्लील छायाचित्रांची धमकी देऊन त्याने युवतीचे लैंगिक शोषण सुरूच ठेवले.दरम्यान, त्याने युवतीला लग्न करण्याचेही आमिष दिले; मात्र विवाह न केल्यामुळे दोघांमध्ये वाद झाले. या वादातच युवतीचे अश्लील छायाचित्र नागेशकडे असल्याची माहिती त्याचा जावई नीलेश बोरकर यांना मिळाली. त्यानेही युवतीला छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचे लैंगिक शोषण सुरू केले. साळा व जावई दोघांनीही पीडित युवतीचे एक ते दीड वर्ष लैंगिक शोषण केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. याप्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन पोलिसांनी साळा व जावई दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title:  Sexual harassment of girl; rape case filed