अकोल्यात युवतीचे लैंगिक शोषण; युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:53 IST2017-12-07T00:50:51+5:302017-12-07T00:53:35+5:30
अकोला : शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक युवती शिक्षणासाठी वाशिम येथे असताना तिचे लैंगिक शोषण करणार्या युवकाविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या युवकाने सदर युवतीचे लग्नही मोडले असून, वारंवार लैंगिक छळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

अकोल्यात युवतीचे लैंगिक शोषण; युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक युवती शिक्षणासाठी वाशिम येथे असताना तिचे लैंगिक शोषण करणार्या युवकाविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या युवकाने सदर युवतीचे लग्नही मोडले असून, वारंवार लैंगिक छळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
अकोला शहरातील एक युवती वाशिम येथे शिक्षणासाठी असताना तिचा मोबाइल क्रमांक विकी कैलास दामोदर याने मिळविला. त्यानंतर या युवतीला वेगवेगळय़ा नावाने फोन करून तिला प्रेमजाळय़ात ओढले. युवती भाड्याने राहत असताना तिच्यावर जबरी संभोग केला. युवतीने या प्रकाराला विरोध केला असता तिला धमक्या देण्यात आल्या. २0१५ मध्ये हा प्रकार घडल्यानंतर युवती अकोल्यात घरी परत आली. त्यानंतर तिचे एका दुसर्या युवकाशी लग्न जुळले; मात्र विकी दामोदर याने सदर युवतीचा मानसिक छळ करीत तिच्यावर जबरी संभोग करण्याचा पुन्हा प्रयत्न केला. त्यामुळे या युवतीने खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी विकी दामोदर याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, ४१७ आणि ५0६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.