अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 15:46 IST2020-02-23T15:46:11+5:302020-02-23T15:46:15+5:30

सिव्हिल लाइन पोलिसांनी आरोपी, त्याची पत्नी व आणखी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Sexual exploitation of minors; A case was registered against the three | अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अकोला: अल्पवयीन मुलीला शिकविण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याने मुलगी गरोदर राहिली. आरोपीने तिचा गर्भपात केल्याचे वैद्यकीय तपासणीनंतर उघड झाले. या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी आरोपी, त्याची पत्नी व आणखी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, १६ वर्षीय शिक्षण देण्याच्या बहाण्याने आदित्य रवींद्र तेलगोटे याने १२ नोव्हेंबर २०१९ रोजी बोलावून लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, पीडितेला मासिक पाळी न आल्याने वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये मुलगी गरोदर असल्याचे समोर आले. कुटुंबीयांनी मुलीला विश्वासात घेत विचारपूस केली असता ही घटना समोर आली. यासंदर्भात कुटुंबीयांनी आरोपी रवींद्र तेलगोटे, रंजना तेलगोटे या दोघांची चौकशी केली असता त्यांनी गर्भपात करण्याचे सांगितले. आरोपीने मुलीचा गर्भपात केल्यामुळे मुलीची प्रकृती बिघडली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी आदित्य रवींद्र तेलगोटे, बिंद्र तेलगोटे व रंजना तेलगोटे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६, ५०६ पोस्को ३, ४, ८, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

 

Web Title: Sexual exploitation of minors; A case was registered against the three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.