Sexual exploitation of a minor girl by assurance of marrying | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गस्थीत असलेल्या लॉजवर नेऊन लैंगिक शोषण केले.पीडितेने ५ एप्रिल रोजी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

मूर्तिजापूर : महाविद्यालयात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिचे सतत तीन महिने लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी एका २३ वर्षीय आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला रविवारी अटक केली.
यासंदर्भात पीडितेने ५ एप्रिल रोजी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. भगोरा येथील आरोपी सुरज राजकुमार जमनिक (२३) याने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून १३ आक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत एका महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीवर, राष्ट्रीय महामार्गस्थीत असलेल्या लॉजवर नेऊन लैंगिक शोषण केले. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सूरज राजकुमार जमणिक (२३) राहणार भगोरा याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ (एन) , ४, १२ पोस्को बाल अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उप-निरीक्षक संगीता गावडे करीत आहेत.(शहर प्रतिनिधी )

Web Title: Sexual exploitation of a minor girl by assurance of marrying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.