अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 10:59 AM2020-03-15T10:59:05+5:302020-03-15T10:59:26+5:30

महादेव लोखंडे याने पातूर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते.

Sexual exploitation of a minor girl; The accused arrested | अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस अटक

Next

शिर्ला/ पातूर : १५ वर्षीय मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीस पातूर पोलिसांनी १४ मार्च रोजी अटक केली. महादेव विष्णू लोखंडे रा. कुंटी ता. खामगाव असे आरोपीचे नाव आहे.
महादेव लोखंडे याने पातूर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. तसेच विविध ठिकाणी नेऊन त्याने मुलीवर अत्याचार केला होता.
कुंटी येथून आरोपी महादेव विष्णू लोखंडे याच्यासह अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन पातूर पोलीस स्टेशनला आणले.
त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीच्या बयाणावरून आरोपी महादेव लोखंडेविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश मोगरे व अनंता राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच पसार झालेल्या मुलीचा शोध घेतला.

Web Title: Sexual exploitation of a minor girl; The accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.