वडगाव रोठे येथे विहिरीत सांगाडा सापडल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 02:09 IST2017-11-16T02:07:41+5:302017-11-16T02:09:11+5:30

तेल्हारा : तालुक्यातील ग्राम वडगाव रोठे येथील गावाबाहेरील विहिरीत १५ नोव्हेंबर रोजी सांगाडा सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

Sensation after finding a skeleton in the well in Waggaon Bethe | वडगाव रोठे येथे विहिरीत सांगाडा सापडल्याने खळबळ

वडगाव रोठे येथे विहिरीत सांगाडा सापडल्याने खळबळ

ठळक मुद्देसांगाडा सापडल्याने गावात एकच खळबळ ग्राम वडगाव रोठे येथील गावाबाहेरील विहिरीत सापडला सांगाडा

लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : तालुक्यातील ग्राम वडगाव रोठे येथील गावाबाहेरील विहिरीत १५ नोव्हेंबर रोजी सांगाडा सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
संग्रामपूर पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या वानखेड येथील ३५ वर्षीय श्रीकृ ष्ण सुरेश सोळंके हा २0१६ मध्ये हरविला होता; मात्र तो वडगाव रोठे येथे त्याच्या नातेवाइकाकडे होता. वडगाव येथे काही मद्यपान करणार्‍यांनी एक वर्षाआधी आम्ही एकाला मारून विहिरीत टाकले, आम्ही काय समजतो, अशी बडबड गावात केल्याने काही सुज्ञ नागरिकांनी तेल्हारा ठाणेदार सचिंद्र शिंदे यांना माहिती दिली. ठाणेदार यांनी १५ नोव्हेंबर रोजी घटनास्थळ गाठून सदर विहिरीत सांगडा असल्याचे दिसले. या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी सदर सांगाडा जप्त करून प्राथमिक चौकशीस प्रारंभ केला. 
सदर प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास तेल्हारा ठाणेदार सचिंद्र शिंदे करीत आहेत. 

Web Title: Sensation after finding a skeleton in the well in Waggaon Bethe