शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या संकेतस्थळावर घर बसल्या पहा वीज मिटरची उपलब्धता

By atul.jaiswal | Updated: July 4, 2018 18:43 IST

संभाव्य ग्राहकांना लागणाऱ्या सर्व वर्गवारीतील मीटर्सबाबतची उपलब्धता महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देमीटर्सबाबतची सद्यस्थिती ते घरबसल्या महावितरणच्या संकेतस्थळावर बघू शकणार आहेत. महावितरणने ग्राहकाभिमूख सोयीकरिता आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. मीटर्सच्या उपलब्धतेबाबत आता कोण्त्याही संबंधित अधिकाऱ्याला टाळाटाळ करता येणार नाही.

अकोला : महावितरणचा कारभार लोकाभिमूख आणि पारदर्शी व्हावा यासाठी महावितरणच्या सोयी सुविधांची माहिती वीजग्राहकांना आॅनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून संभाव्य ग्राहकांना लागणाऱ्या सर्व वर्गवारीतील मीटर्सबाबतची उपलब्धता महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कोणत्याही ग्राहकाला नवीन विद्युतपुरवठा हवा असल्यास त्यासाठी लागणाऱ्या मीटर्सबाबतची सद्यस्थिती ते घरबसल्या महावितरणच्या संकेतस्थळावर बघू शकणार आहेत. मीटर्सच्या उपलब्ध्तेबाबत माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्याने महावितरणने ग्राहकाभिमूख सोयीकरिता आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.महावितरणने सर्व वर्गवारीतील संभाव्य वीजग्राहकांना मीटर्सची उपलब्धता आता महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. यात घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांच्या वर्गवारीतील ग्राहकांना लागणाऱ्या मीटर्सच्या उपलब्धतेबाबत उपविभागीय कार्यालयापर्यन्त समावेश करण्यात आला आहे.टाळाटाळीला बसणार चापमहावितरणच्या संकेतस्थळावर शाखा कार्यालयांपर्यन्त मीटर्सबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे येथून पुढे आता ग्राहकांना मीटर्स नाहीत या सबबीखाली त्यांची गैरसोय होणार नाही. मीटरच्या पुरवठ्याबाबत व सद्यस्थितीबाबत ते स्वत: महावितरणच्या संकेतस्थळाला भेट देऊन मीटर्सच्या उपलब्धतेबाबत खातरजमा करू शकणार आहेत. त्यामुळे मीटर्सच्या उपलब्धतेबाबत आता कोण्त्याही संबंधित अधिकाऱ्याला टाळाटाळ करता येणार नाही.टोल फ्री क्रमांक उपलब्धमहावितरणच्या टोल फ्री क्र. १८०० १०२ ३४२५ व १८०० २३३ ३४३५ यावर संभाव्य वीजग्राहक नवीन वीजपुरवठा, त्वरित जोडणीकरिता किंवा नादुरुस्त मीटर बदलणेकरिता संपर्क साधू शकतात.

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण