शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

By admin | Updated: March 6, 2015 02:19 IST

चोरट्याने दिली अकोला व वाशिम जिल्ह्यात चो-या केल्याची कबुली.

वाशिम : वाशिम शहरातील दोन मेडिकल्स स्टोअर्सचे दुकान फोडून त्यामधील रोख ६८ हजार लंपास करणारा सराईत गुन्हेगाराचा वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन ब्रँचने शोध घेऊन त्याला ५ मार्च रोजी अटक केली. चार महिन्यांपूर्वी गुरुकृपा मेडिकलचे शटर तोडून त्यामधील रोख ५0 हजार रुपये व २ मार्च रोजी अथर्व मेडिकल्सचे शटर तोडून त्यामधील रोख १८ हजार ९00 रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केल्याच्या तक्रारी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या होत्या. या चोरीचा तपास ठाणेदार संग्राम सांगळे यांनी डीबी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक उदय सोयस्कर, एनपीसी सुनील पवार, राजेश बायस्कर, हरिष दंदे व मंगेश नरवाडे यांच्या पथकाला दिला. या पथकाने गेल्या १५ दिवसांपासून चोरट्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले. अखेर पोलिसांना मूर्तिजापूर तालुक्यातील पळसो बढे येथील आरोपी गजानन नरसिंगराव डाबेराव याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर गजानन डाबेराव याने अकोला व वाशिम जिल्ह्यात बर्‍याच ठिकाणी चोर्‍या केल्याची कबुली दिली. गेल्या महिनाभरापासून वाशिम शहरात चोरीच्या घटना सातत्याने वाढत असल्याने पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पकडलेल्या सराईत गुन्हेगारामुळे अनेक चोर्‍यांचा शोध लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.