शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
2
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
3
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
4
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
5
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
6
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
7
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
8
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
9
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
10
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
11
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
12
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
13
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
14
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
15
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
16
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
17
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
18
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
19
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
20
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव

वाळू टंचाईचा घरकुल बांधकामांना फटका; ६३६९ घरकुलांची कामे रेंगाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 2:03 PM

मोफत वाळूची उचल करण्यासाठी वाळू घाटांत वाळू उपलब्ध नसल्याने, जिल्ह्यातील ग्रामीण भागात ६ हजार ३६९ घरकुलांची बांधकामे कामे रेंगाळली आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील २० वाळू घाटांपैकी ११ वाळू घाटांचा आॅनलाइन लिलाव करण्यात आला. उर्वरित ९ वाळू घाट पाटबंधारे विभागांतर्गत जिल्ह्यातील सिंचनाच्या कामांसाठी आरक्षित करण्यात आले.मोफत वाळूची उचल करण्याकरिता वाळू घाटांत वाळू उपलब्ध नसल्याने, जिल्ह्यात घरकुलांची कामे रेंगाळली आहेत.

- संतोष येलकर

अकोला: प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल बांधकामांसाठी लाभार्थींना पाच ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून द्यायची आहे; मात्र मोफत वाळूची उचल करण्यासाठी वाळू घाटांत वाळू उपलब्ध नसल्याने, जिल्ह्यातील ग्रामीण भागात ६ हजार ३६९ घरकुलांची बांधकामे कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे वाळू टंचाईचा घरकुलांच्या बांधकामांना फटका बसल्याचे वास्तव समोर येत आहे.प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०१६-१७ ते १८-१९ या तीन वर्षात जिल्ह्यातील ग्रामीण भागात १८ हजार ८३६ घरकुलांच्या बांधकामांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी एप्रिल अखेरपर्यंत १२ हजार ४६७ घरकुलांची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित घरकुलांची बांधकामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गत २४ फेबु्रवारी रोजीच्या शासन निर्णयानुसार पर्यावरण परवानगी प्राप्त झालेल्या वाळू घाटांतून घरकुल बांधकामांसाठी लाभार्थींना प्रत्येकी पाच ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून द्यायची आहे. तसेच मोफत वाळूची उचल संबंधित लाभार्थीने करावयाची आहे. दरम्यान, राज्य पर्यावरण समितीकडून परवानगी मिळाल्यानंतर गत १६ मार्च रोजी जिल्ह्यातील २० वाळू घाटांपैकी ११ वाळू घाटांचा आॅनलाइन लिलाव करण्यात आला. तर उर्वरित ९ वाळू घाट पाटबंधारे विभागांतर्गत जिल्ह्यातील सिंचनाच्या कामांसाठी आरक्षित करण्यात आले. घरकुलांच्या बांधकामांसाठी लाभार्थींना मोफत वाळूची उचल करण्याकरिता वाळू घाटांत वाळू उपलब्ध नसल्याने, जिल्ह्यात घरकुलांची कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे वाळू टंचाईच्या परिस्थितीत जिल्ह्यातील घरकुलांच्या बांधकामांना फटका बसला आहे.पूर्ण करण्यात आलेली अशी आहेत घरकुलांची कामे!तालुका            घरकुलअकोला               २२०७अकोट                 २६५६बाळापूर              १५३६बार्शीटाकळी          ७५६मूर्तिजापूर            २१५८पातूर                  १०७६तेल्हारा             २०७८...........................................एकूण              १२४६७पाणीटंचाईचेही सावट!तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. तहान भागविण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण असताना घरकुल बांधकामासाठी लागणारे पाणी कोठून आणणार, असा प्रश्न घरकुल लाभार्थींसमोर निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने घरकुल बांधकामांसाठी वाळू टंचाईच्या प्रश्नासोबतच पाणीटंचाईचेही सावट निर्माण झाले आहे.सिंचनाच्या कामांसाठी नऊ वाळू घाट आरक्षित!राज्य पर्यावरण समितीच्या परवानगीनंतर जिल्ह्यातील २० वाळू घाटांपैकी ११ वाळू घाटांचा लिलाव करण्यात आला असून, ९ वाळू घाट पाटबंधारे विभागांतर्गत जिल्ह्यातील सिंचनाच्या कामांसाठी आरक्षित करण्यात आले. त्यामध्ये अकोला तालुक्यातील २, अकोट तालुक्यात १, बाळापूर तालुक्यात ५ व मूर्तिजापूर तालुक्यातील १ वाळू घाटाचा समावेश आहे. पर्यावरण परवानगी प्राप्त वाळू घाटातून घरकुलांच्या बांधकामांसाठी लाभार्थींना पाच ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून द्यायची आहे; मात्र घरकुल बांधकामांसाठी लागणारी वाळू जिल्ह्यातील वाळू घाटांत उपलब्ध नसल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांनी सांगितले.प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात घरकुलांची बांधकामे करण्यासाठी वाळू टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे; मात्र यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून वाळू टंचाईच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कामे मार्गी लावून जिल्ह्यातील घरकुल बांधकामांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे.- आयुष प्रसादमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

 

टॅग्स :Akolaअकोलाsandवाळूgovernment schemeसरकारी योजना