लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: लोकमत सखी मंचच्या वतीने पोलीस बंधूंना रक्षाबंधन करण्याचा उपक्रम हा अनुकरणीय असून, ज्या पोलीस बंधूंना रक्षाबंधनासाठी आपल्या बहिणीकडे उपस्थित राहणे शक्य होत नाही त्यांना सखी मंचच्या माध्यमातून अनेक बहिणींची माया मिळते.लोकमत सखी मंच अकोला च्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसद्धा पोलीस बंधूंसमवेत रक्षाबंधनाचा उपक्रम सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन, अकोलामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी लोकमतचे संस्थापक, संपादक श्रद्धेय जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून व दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक अदिती कुळकर्णी यांनी सखी मंचच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन पोलीस बंधूंना राखी बांधण्याचे प्रयोजन विशद केले. यावेळी सर्व सखींनी ठाणेदार भानुप्रताप मडावी व उपस्थित सर्व पोलीस दादांना राखी बांधून ओवाळले. यावेळी पोलीस बंधू भावुक झाले होते.
सखी मंचच्या रक्षाबंधनाने पोलीसदादा भारावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 16:21 IST