शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

शासकीय जागेत असलेल्या शाळांनाही ‘आरटीई’चे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:26 AM

शासकीय जागांवर असलेल्या शाळांची माहितीही शासनाने घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत आर्थिक दुर्बल व मागास घटकांतील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देणाऱ्या १८ शाळांनी शासकीय जागेत असतानाही अनुदान घेतल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे, पुढील अनुदानाची मागणीही केली आहे. दरम्यान, शासकीय जागांवर असलेल्या शाळांची माहितीही शासनाने घेतली आहे. त्यामुळे आता अनुदानाबाबत कोणता निर्णय होईल, याची धास्ती संस्था चालकांना आहे.शिक्षण हक्क अधिनियमानुसार २५ टक्के प्रवेश देणाºया शाळांना विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार देय अनुदानाचे प्रस्ताव राज्याच्या शिक्षण विभागाकडे सादर करण्यात येतात. ते प्रस्ताव सादर करण्यापूर्वी नियमाप्रमाणे पात्र विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिले काय, उत्पन्न गटात ते पात्र आहेत का, संबंधित पुराव्याची कागदपत्रे शाळांमध्ये उपलब्ध आहेत का, या बाबींचा पडताळणी करण्याचा आदेश शिक्षण विभागाने सातत्याने दिला. त्यानुसार सप्टेंबर २०१९ मध्ये एकाचवेळी ५२ पथकांकडून शाळांची तपासणी करण्यात आली. त्या पथकांनी संबंधित शाळेला सवलतीच्या दरात किंवा अल्प मोबदल्यात जमीन मिळाली काय, शाळांनी आॅडिट रिपोर्ट सादर केला का, आरटीई पोर्टलवर शाळांना शुल्काचा तपशील प्रसिद्ध केला का, सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जोडले का, शुल्क नियमन कायद्यानुसार पालक-शिक्षक सभेचा ठराव दिला का, शिक्षण हक्क अधिनियमानुसार शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता घेतली का, या मुद्यांची पडताळणी केली.

शासकीय भूखंडावर असलेल्या शाळाब्ल्यू लोटस इंग्लिश स्कूल शिवणी, ज्युबिली इंग्लिश स्कूल रामदासपेठ, एलएनपी कॉन्व्हेंट शिवर, मदर टेरेसा कॉन्व्हेंट, अकोला, नूतन कॉन्व्हेंट अकोट, परशुराम नाईक प्राथमिक इंग्लिश स्कूल बोरगाव मंजू, शांतिनिकेतन प्रायमरी स्कूल खरप बु., म्हाळसा नारायणी पब्लिक स्कूल जठारपेठ, विनयकुमार पाराशर स्कूल डाबकी रोड, उजवणे इंग्लिश स्कूल डाबकी रोड, उत्तमचंद राजेश्वर स्कूल जुने शहर, वंदेमातरम् नूतन मराठी रामदासपेठ, अहिल्यादेवी होळकर शिशू मंदिर स्कूल अकोला, संस्कार इंग्लिश स्कूल गुडधी, किड्स केंब्रिज प्री-प्रायमरी स्कूल अकोला, स्कूल आॅफ स्कॉलर्स बिर्ला कॉलनी अकोला, संत गाडगेबाबा इंग्लिश स्कूल मूर्तिजापूर, मूर्तिजापूर पब्लिक स्कूल मूर्तिजापूर.

तपासणीत आढळल्या अनेक त्रुटीशासनाने दिलेल्या मुद्यांनुसार १४ शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याच्या शुल्क पावत्या नाहीत. पालक-शिक्षक सभेचे ठराव नाहीत. १८ शाळा शासकीय जागांवर चालविल्या जात आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाRight To Educationशिक्षण हक्क कायदा