दानापुरात हिवरखेड पाेलिसांचा रूट मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:14 IST2021-01-10T04:14:26+5:302021-01-10T04:14:26+5:30
दानापूर : तेल्हारा तालुक्यात १५ जानेवारीला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच शांततापूर्ण वातावरणात ...

दानापुरात हिवरखेड पाेलिसांचा रूट मार्च
दानापूर : तेल्हारा तालुक्यात १५ जानेवारीला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडावे, या उद्देशाने दानापूर येथे हिवरखेड पोलिसांनी रूट मार्च केला. मागील निवडणुकीचा आढावा घेऊन आयोगाच्या अहवालात संवेदनशील म्हणून प्रस्तावित ८ ग्रामपंचायतींमध्ये दानापूर ग्रामपंचायत समाविष्ट झाल्याने हिवरखेड ठाण्याच्या पोलिसांनी पथसंचलन केले. गावातील वाॅर्ड क्र. ५ मधील पाण्याच्या टाकीपासून बुद्धविहार, ग्रामपंचायत, गांधी चौक, मस्तानशहा दर्गा, आठवडी बाजार, बसस्थानक असा रूटमार्च काढण्यात आला. यावेळी हिवरखेड पाेलीस स्टेशचे ठाणेदार धीरज चव्हाण, पीएसआय गोपाल दातीर, विठ्ठल वाणी, सुरवाडे मेजर, आकाश राठोड, प्रफुल पवार, पोलीसपाटील संतोष माकोडे यांच्यासह होमगार्ड जवानांचा सहभाग होता.