मुकुंद नगरातील दोन घरे फोडली; ८० हजार रूपयांचा मुद्देमाल पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 18:19 IST2019-08-17T18:19:28+5:302019-08-17T18:19:40+5:30
नलीनी सहदेवराव शेगोकार आणि मुरलीधर देवराव कड या दोघांची घरे अज्ञांत चोरट्यांनी गुरुवारच्या रात्री फोडली.

मुकुंद नगरातील दोन घरे फोडली; ८० हजार रूपयांचा मुद्देमाल पळविला
अकोला : सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुकुंद नगरात चोरट्यांनी दोन घरे फोडून ८० हजार रूपयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना गुरुवारी रात्री दरम्यान घडल्यानंतर ही घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी तक्रारीवरून सिव्हील लाईन्स पोलिसांनी अज्ञांत चोरटयांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुकुंद नगरातील रहिवासी नलीनी सहदेवराव शेगोकार आणि मुरलीधर देवराव कड या दोघांची घरे अज्ञांत चोरट्यांनी गुरुवारच्या रात्री फोडली. यामध्ये नलीनी शेगोकार यांच्या घरातून नगदी २० हजार रूपये आणि मुरलीधर कड यांच्या घरातून नगदी १८०० रुपए आणि सोने-चांदीचे दागिने असा एकूण ८० हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी दोघांनीही दिलेल्या तक्रारीवरून सिव्हील लाईन्स पोलिसांनी अज्ञांत चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरटयांचा हैदोस सुरु असतांना पोलिस मात्र झोपेत असल्याचे दिसून येत आहे. या परिसरातील चिडीमारीही प्रचंड वाढली असून पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.