शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वाआयुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात दरोडा, वृद्ध दाम्पत्यास लूटले

By admin | Updated: October 22, 2014 18:24 IST

अकोल्यातील गंगानगर भागातील घटना.

अकोला: अकोल्यातील गंगानगर भागातील एका घरावर दरोडा घालून ७ ते ८ दरोडेखोरांनी एका वृद्ध दाम्पत्यास लुटल्याची घटना सोमवारी मध्यरात्री २.३0 ते ३ वाजताच्या सुमारास घडली. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अंबादासपंत माथुरकर(६५), त्यांची पत्नी प्रभावती हे मुलगा सचिन आणि सून श्‍वेता यांच्यासमवेत गंगा नगरात राहतात. सोमवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी माथुरकर यांच्या घराच्या मागच्या भागाचे दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दरोडेखोरांनी माथुरकर यांचा मुलगा व सून झोपलेल्या बेडरूमच्या दाराची कडी बाहेरून लावून घेतली. त्यानंतर दरोडेखोरांनी अंबादासपंत यांच्या बेडरूममध्ये प्रवेश करून, अंबादासपंत व त्यांच्या पत्नीस मारहाण केली. घरातील रोकड व अंगावरील सोन्याचे दागिने काढण्यास त्यांनी बजावले. दरम्यान प्रभावतींनी आरडाओरड सुरू केली. या आवाजामूळे त्यांच्या मुलाला जाग आली आणि त्याने बाहेर येण्याचा प्रयत्न केला; परंतू दरोडेखोरांनी त्याच्या बेडरूमचा दरवाजा आधीच बंद केला होता. या प्रकारामुळे माथुरकर यांची नात वेदांती व समृद्धी या रडायला लागल्या. दरोडेखोरांनी लोखंडी रॉडने अंबादासपंत आणि त्यांच्या पत्नीस मारहाण करून त्यांच्याकडील चाब्या घेतल्या. कपाटातील रोख ५0 हजार रूपये आणि २.३0 ते ३ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन त्यीनी पोबारा केला. दरोडेखोरांच्या मारहाणीत अंबादासपंत यांच्या डाव्या पायाचे हाड मोडले असून, डोक्याला गंभीर दुखापत झाली. या हल्ल्यात त्यांची पत्नीही किरकोळ जखमी झाली.

*दोन घरांवर दरोड्याचा प्रयत्न

माथुरकर यांच्या घरावर दरोडा टाकण्यापूर्वी दरोडेखारांनी त्यांच्या घरामागे राहणारे नवीन त्रिवेदी यांच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरासमोर उभी असलेली मारूती कार चोरण्याचा प्रयत्न केला. त्रिवेदी यांच्या घराचे लोखंडी ग्रीलसुद्धा तोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यानंतर दरोडेखोरांनी अरूण शाह यांच्या घरातही चोरी करण्याचा प्रयत्न केला.

*तीन पाळतीवर, पाच जण घरात

दरोडेखोरांपैकी तीन जण घराबाहेर थांबून हालचालींवर पाळत ठेवून होते. उर्वरित पाच जणांनी घरावर दरोडा टाकला. वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून रोकड व सोन्याचे दागिने लंपास केले.