लुटमारप्रकरणातील आरोपीला कोठडी

By Admin | Updated: August 29, 2015 00:21 IST2015-08-29T00:21:52+5:302015-08-29T00:21:52+5:30

आरोपीस प्रथम श्रेणी न्यायालयाने ३0 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Robbery accused in custody | लुटमारप्रकरणातील आरोपीला कोठडी

लुटमारप्रकरणातील आरोपीला कोठडी

अकोला: एलआरटी महाविद्यालयासमोर पक्षी विक्रीचा व्यवसाय करणारा प्रेमराज रामलाल तायडे यांना मारहाण करून त्यांच्याकडील ४३ हजार रुपयांची रोकड पळविणार्‍या तीन आरोपींना पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री अटक केली. तीनही चोरट्यांना शुक्रवारी प्रथम श्रेणी न्यायालयाने ३0 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पक्षी विक्रेता प्रेमराज तायडे गुरुवारी सायंकाळी प्रतिष्ठानमध्ये असताना स्वप्निल वसंत वानखडे, आकाश संतोष भालेराव व शुभम हरी सावंत हे तिघे जण त्यांच्या प्रतिष्ठानमध्ये शिरले. त्यानंतर तायडे यांना मारहाण करीत प्रतिष्ठानमधील रोकड व त्यांच्या खिशातील अशाप्रकारे एकूण ४३ हजार ५00 रुपये घेऊन तिघेही पसार झाले होते. या प्रकरणाची तक्रार सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी तीनही चोरट्यांना अटक करून शुक्रवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस.एस. जांभळे यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: Robbery accused in custody