शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कॉंग्रेस कामगार सेलच्या कामाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:19 IST

जेसीआय अकोटतर्फे ऑनलाईन नोंदणी अकोटः भारतीय जेसीसची शाखा असलेल्या जेसीआय अकोटच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण ऑनलाइन नोंदणी ...

जेसीआय अकोटतर्फे ऑनलाईन नोंदणी

अकोटः भारतीय जेसीसची शाखा असलेल्या जेसीआय अकोटच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण ऑनलाइन नोंदणी अभियानाचे उद्घाटन अध्यक्ष नितीन शेगोकार, पवन ठाकूर,उपाध्यक्ष निलेश इंगळे, अजय अडोकार, सचिव सागर बोरोडे यांनी केले. नागरिकांनी सेतू केंद्र कृषी विद्यालयासमोर येथे स्वतःचा मोबाईल व आधार कार्ड घेऊन नोंदणी करावी.

नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत

खानापूर: आस्टुल येथील शेतकरी चिंतामण चवरे यांचा आगीत गहू जळाला होता. त्यांना शिवसेना कार्यकर्ते संदीप गजानन गिऱ्हे यांनी रोख स्वरूपात मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली. चवरे यांच्या दोन एक शेतातील गंजीला अज्ञात व्यक्तीने २४ मार्च रोजी आग लागली होती.

माना येथे कोरोना लसीकरण

माना: माना येथे जिल्हा परिषद आयुर्वेद दवाखान्यामध्ये २५ मार्च रोजी कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. अध्यक्षस्थानी वंदना सतीश मोखडकर होत्या. उद्घाटन रिजवाना परवीन शेख मुख्तार, हारूण डी. राव, सतीश मोखडकर, मुख्तार शेख यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. विशाल काळे, डॉ. सोहेल कादरी, सारिका माकोडे, संजय काळे, धारपवार, रमेश देशमुख, राजेंद्र भारसाकळे यांनी लसीकरणाचा लाभ घेतला.

फोटो:

माना येथे महासमृद्धी महिला सक्षमीकरण

माना: महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानाअंतर्गत मनरेगा अंतर्गत १०० दिवसांचा रोजगार मिळालेल्या लाभार्थ्यांची दीनदयाल ग्रामीण कौशल्य विकास योजना व कृषी विज्ञान केंद्र आरसिटी अंतर्गतविविध व्यावसायिक कोर्सेस करिता नोंदणी करण्यात आली. नोंदणी करण्याकरिता प्रभारी तालुका व्यवस्थापक निलेश दहातोंडे, प्रभाग समन्वयक इंदुरकर, संगीता माहुरे, सुचिता मेटांगे, कांचन तायडे यांनी प्रयत्न केले.

फोटो: