शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

तुकडोजी महाराजांच्या भक्तांचा संघर्षाचा संकल्प

By admin | Updated: October 16, 2014 00:08 IST

राष्ट्रसंतांचा थोर पुरुषांच्या यादीत समावेश करण्याची मागणी.

वाशिम : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव देशातील थोर पुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्याच्या मागणीस शासनाने बगल दिल्याने, गुरुदेवभक्त व्यथीत झाले आहेत. त्याअनुषंगाने राष्ट्रसंतांच्या ४६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त १३ ऑक्टोबरला आयोजित कार्यकर्ता संमेलनामध्ये, हजारो गुरुदेवभक्तांनी आता माघार न घेण्याचा निर्धार व्यक्त करून, लोकशाही मार्गाने या मुद्यावर शासनाशी लढा देण्याचा संकल्प केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे देशाच्या स्वातंत्र्य लढय़ातील योगदान, तसेच देशाच्या नवनिर्मीतीसाठी त्यांनी केलेले कार्य विचारात घेऊन, राष्ट्रसंतांचे नाव थोर पुरुषांच्या यादीत समाविष्ट करावे, तसेच शासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रसंतांचे छायाचित्र लावण्यात यावे, असा प्रस्ताव मोझरी येथील अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमाने विभागीय आयुक्तांमार्फत ३१ ऑक्टोबर २0१२ रोजी शासनाकडे पाठविला होता.दोन वर्षे त्याचा पाठपुरावा करण्यात आला; परंतू शासनाकडून प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी यासंदर्भात माहिती अधिकाराच्या माध्यमातून गुरुदेव सेवा मंडळाचे पुसद तालुका सेवाधिकारी प्रकाश दाभाडकर यांनी शासनाला विचारणा केली. त्यानुसार शासकीय कार्यालयांमधील थोर पुरुषांच्या छायाचित्रांची संख्या पाहता, आणखी छायाचित्र लावताना जागेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावावर निर्णय घेणे श क्य नसल्याचे शासनाने स्पष्ट केले. 'लोकमत'ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित करताच, राष्ट्रसंतांचे नाव थोर पुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्याची गुरुदेव सेवा मंडळाची मागणी चळवळीत बदलली. राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करून गुरुदेव भक्तांनी मागणीची निवेदने सादर केली. ९ ते ३0 ऑगस्टदरम्यान विदर्भातील अकराही जिल्ह्यांमध्ये क्रांतीज्योत यात्रेच्या माध्यमातून व्यापक जनजागरण करण्यात आले. मात्र शासनाने अद्यापही ठोस भूमिका न घेतल्याने, राज्यात नवे सरकार आल्यानंतर तीव्र आंदोलन करण्याचे पदाधिकार्‍यांनी ठरविले आहे.