शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

विद्यावेतनासाठी निवासी डॉक्टर आंदोलनाच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 3:32 PM

अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांना डिसेंबर २०१८ पासूनचे विद्यावेतन थकीत आहे.

अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांना डिसेंबर २०१८ पासूनचे विद्यावेतन थकीत आहे. यासंदर्भात निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेतर्फे राज्य शासनाला पत्र पाठविण्यात आले असून, प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली आहे, अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलनाचाही इशारा ‘मार्ड’तर्फे देण्यात आला.राज्यात नागपूर, अकोला, अंबेजोगाई आणि लातूर येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या जवळपास एक हजार निवासी डॉक्टरांना गत तीन महिन्यांपासून विद्यावेतन मिळाले नाही. यामध्ये अकोल्यातील ९१ निवासी डॉक्टरांचा समावेश आहे. यापूर्वीदेखील निवासी डॉक्टरांना विद्यावेतनाच्या समस्येला सोमोरे जावे लागले आहे. त्यावेळी निवासी डॉक्टरांनी राज्यव्यापी संप पुकारला होता. संप मागे घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने मानधन देण्याचा आदेश दिला होता. एक कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती; पण हे पैसे महाविद्यालयापर्यंत पोहोचले नाहीत. त्यामुळे निवासी डॉक्टरांसमोर पुन्हा विद्यावेतनाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. आचारसंहितेचे कारण पुढे करीत शासनातर्फे हा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न होत असल्याचे ‘मार्ड’चे म्हणणे आहे. त्यामुळे आता थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मानधन वाढ आणि रखडलेल्या विद्यावेतनाचा मुद्दा उपस्थित करण्यात येणार आहे. हा प्रश्न मार्गी न लागल्यास राज्यव्यापी बेमुदत संपावर जाण्याचा इशारादेखील डॉक्टरांनी दिला आहे.जूनपर्यंत विद्यावेतन नाही!मागील तीन महिन्यांपासून निवासी डॉक्टरांना विद्यावेतन मिळाले नाही. अशातच वेतनासाठी फंड नसल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे जून महिन्यापर्यंत निवासी डॉक्टरांना विद्यावेतनाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अशा परिस्थितीत निवासी डॉक्टरांच्या समस्या आणखी वाढणार आहेत.आम्ही तासन्तास रुग्णसेवेसाठी झटत असतो; पण आता आमचा संयम संपत आहे. शासनाने आम्हाला आमचा हक्क द्यावा, यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर शासनासोबत चर्चा सुरू आहे. शासनाने प्रश्न निकाली न काढल्यास राज्यव्यापी आंदोलन करू.- डॉ. क्रिष्णा ग्रीष्मा, जिल्हाध्यक्ष, मार्ड.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयdoctorडॉक्टर