शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

रिलायन्स कंपनीचा अकोला महापालिकेला ठेंगा; १२ लाखांचा दंड जमा केलाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 1:13 PM

अकोला : महापालिकेची मुख्य जलवाहिनी फोडून लाखो लीटर पाण्याचा अपव्यय करणाºया रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीने महापालिका प्रशासनाला ठेंगा दाखवला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाने रिलायन्स कंपनीला जलवाहिनीच्या दुरुस्तीपोटी आठ लाख रुपये व पाण्याचा अपव्यय केल्याप्रकरणी चार लाख, असा एकूण १२ लाख रुपयांचा दंड आकारला होता.तरीही कंपनीने मागील तीन महिन्यांपासून मनपा प्रशासनाला चांगलेच झुलवत ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांनी कंपनीविरोधात खदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

अकोला : महापालिकेची मुख्य जलवाहिनी फोडून लाखो लीटर पाण्याचा अपव्यय करणाºया रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीने महापालिका प्रशासनाला ठेंगा दाखवला आहे. प्रशासनाने रिलायन्स कंपनीला जलवाहिनीच्या दुरुस्तीपोटी आठ लाख रुपये व पाण्याचा अपव्यय केल्याप्रकरणी चार लाख, असा एकूण १२ लाख रुपयांचा दंड आकारला होता. कंपनी दंडात्मक रकमेचा भरणा करीत नसल्याचे पाहून खदान पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली. तरीही कंपनीने मागील तीन महिन्यांपासून मनपा प्रशासनाला चांगलेच झुलवत ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सत्तापक्ष व प्रशासन काय निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.शहरालगत रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीच्यावतीने केबल टाकण्यासाठी खोदकाम केले जात आहे. खडकी परिसरातील श्रद्धानगर येथे कंपनीच्या खोदकामात मनपाची ९०० व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटण्याचा प्रकार २२ सप्टेंबर रोजी घडला होता. त्यामुळे ऐन जलसंकटाच्या परिस्थितीत लाखो लीटर पाण्याचा अपव्यय झाला. महापालिका प्रशासनाने जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण केल्यानंतर रिलायन्स कंपनीच्या विरोधात कारवाईचा दांडुका उगारला होता. ९०० व्यासाची मुख्य जलवाहिनी फोडणाºया कंत्राटदार स्वामी टेलीनेट अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन कंपनी, धुळे यांना १२ लाखांचा दंड आकारला होता. यामध्ये जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी आठ लाख रुपये आणि शुद्ध पाण्याचा अपव्यय झाल्यामुळे चार लाख रुपये दंडात्मक रकमेचा समावेश होता. महिनाभराचा कालावधी उलटून गेल्यावरही कंपनी दंडात्मक रकमेचा भरणा करीत नसल्याचे पाहून भाजप नगरसेवक विजय इंगळे यांनी कंपनीच्या विरोधात प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला. कंपनीने दंड न भरल्यास नियमानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक इंगळे यांनी केली होती. त्यानंतर जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांनी कंपनीविरोधात खदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवूनही आता महिनाभराचा कालावधी होत आहे. अद्यापपर्यंतही रिलायन्स कंपनीने दंडाच्या रकमेचा भरणा न करता महापालिकेला झुलवत ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. एकूणच प्रकार पाहता याप्रकरणी नगरसेवक विजय इंगळे यांच्याही भूमिकेकडे लक्ष लागले आहे.प्रशासनाला आव्हान कसे?दंडाची रक्कम कमी व्हावी म्हणून कंपनीचे काही प्रतिनिधी ‘सेटिंग’ करीत असल्याची माहिती आहे. ऐन पाणीटंचाईच्या काळात जलवाहिनी फोडणाºया व शहरात मनपाच्याच परवानगीने फोर-जी केबलचे जाळे टाकणाºया रिलायन्स कंपनीने प्रशासनाला दिलेले आव्हान पाहता सगळी डाळच काळी असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाReliance Jioरिलायन्स जिओ