शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रतिबिंब मराठी साहित्यात

By admin | Updated: February 14, 2015 01:21 IST

अकोला येथील ग्रंथोत्सव-२0१५ परिसंवादातात उमटला मान्यवरांचा सूर.

अकोला : देशात प्रत्येक प्रांतात अंधश्रद्धेला मोठय़ा प्रमाणात महत्त्व दिलं जातं. भाबड्या कल्पनेमागे धावण्याची सवय लोकांना लागली आहे. पुरातन काळापासून चालत आलेल्या चाली-रीती आणि रुढी-परंपरांना चिकटलेल्या या लोकांना दूर सारण्यासाठी संत महात्म्यांनी आपल्या साहित्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केले आहे. सत्यशोधक, दलित, स्त्रीवादी, अभिजनवादी अशा विविध प्रकारांनी नटलेले मराठी साहित्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रतिबिंब उमटले असल्याचा सूर शुक्रवार, १३ फेब्रुवारी रोजी ग्रंथोत्सवात पार पडलेल्या परिसंवादात उमटला. ग्रंथोत्सव-२0१५ निमित्त श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात ह्यमराठी साहित्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रतिबिंब उमटले आहे का?ह्ण या विषयावर आयोजित परिसंवादात वध्र्याच्या प्रा. नूतन माळवी, अकोल्याचे डॉ. गोपाल उपाध्ये व प्रा. संजय पोहरे सहभागी झाले होते. ह्यमाटिका इक नाग बनाके; पुजे लोग लुगाया, जिंदा बाप कोई न पूजे, मरे बाप पुजवाया.ह्ण कबिराच्या दोहय़ाने प्रा. नूतन माळवी यांनी परिसंवादाला सुरुवात केली. संतपरंपरेत संत नामदेव, तुकाराम महाराज यांनी रचलेल्या साहित्याची उकल करीत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, बहिणाबाई आदींनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी विज्ञानवादी दृष्टिकोनातून त्यांच्या साहित्यात मांडलेले विचार अंगीकारण्याची गरज असल्याचे मत प्रकट केले.