शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

युतीच्या मुद्यावर पुनर्विचार करावा!

By admin | Updated: January 28, 2017 01:43 IST

शिवसेनेकडून महसूलमंत्र्यांना अपेक्षा.

अकोला, दि. २७- शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे संयमी नेते आहेत. त्यांच्यासोबत माझे चांगले संबंध असून, भविष्यात भाजपसोबत कोणतीच युती राहणार नाही, अशी भाषा ठीक वाटत नाही. युतीच्या मुद्यावर ते नक्कीच पुनर्विचार करतील, असा आशावाद राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीनिमित्त ते अकोल्यात आले असता बोलत होते. मुंबई महापालिकेच्या जागा वाटपाच्या मुद्यावरून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत असलेली युती तुटल्याचे जाहीर केले. युती नसेल तर मत विभाजनाचा काँग्रेसला फायदा होणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझे अनेक वर्षांपासून चांगले संबंध आहेत. मनपा व जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर युती तोडणे हा पर्याय होऊ शकत नसल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. राजकारणात हे असं चालायचंच असं म्हणत येत्या तीन दिवसांत उद्धवजी युतीच्या विषयावर पुनर्विचार करतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिकेपुरती युती तुटली असती, तरीही राज्यातील इतर महापालिकांसाठी ती कायम राहू शकली असती. २0१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील दोन्ही पक्षांच्या कामगिरीवर चर्चा होणे अपेक्षित होते. निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता त्यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला चर्चेला येण्यासाठी केलेल्या आवाहनाची पाटील यांनी खिल्ली उडविली. भाजप-शिवसेना युतीचं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट करीत युती तुटल्यानं उगीच कुणी मनातल्या मनात मांडे खावू नये, असा टोला त्यांनी पवारांना लगावला.सरकारला पाच वर्षे धक्का नाही!भाजप-शिवसेना युतीचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ निश्‍चितच पूर्ण करेल, यात शंका नसल्याचा विश्‍वास महसूलमंत्री पाटील यांनी व्यक्त केला. मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने घेतलेल्या निर्णयाचा राज्य सरकारला कोणताही धक्का लागणार नसल्याने अनेकांचे मनसुबे उधळल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.