शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

‘बीडीओं’वर कारवाईची शिफारस

By admin | Updated: August 20, 2016 02:47 IST

अकोला जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सातत्याने अनुपस्थित राहणा-या गटसमिती अधिका-यांवर कारवाई करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

अकोला, दि १९: स्थायी समितीच्या सभेला प्रत्येक सभेला जिल्हय़ातील पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी (बीडीओ) गैरहजर राहत असल्याच्या मुद्दय़ावर शुक्रवारी जिल्हा परिषद सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत, कारवाईची मागणी केली. त्यानुसार सभेला गैरहजर राहणार्‍या जिल्हय़ातील बीडीओंवर कारवाई करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे शिफारस करण्याचा ठराव या सभेत मंजूर करण्यात आला.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी आदेश दिल्यानंतरही जिल्हा परिषदेच्या प्रत्येक सभेला जिल्हय़ातील पंचायत समितींचे गटविकास अधिकारी हजर का राहत नाही, असा प्रश्न सदस्य विजय लव्हाळे, शोभा शेळके यांनी सभेत उपस्थित केला. सभेला वारंवार गटविकास अधिकारी गैरहजर राहत असल्याच्या मुद्दय़ावर समिती सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत आक्रमक पवित्रा घेतला तसेच यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी लावून धरली. त्यानुसार स्थायी समितीच्या प्रत्येक सभेला गैरहजर राहणार्‍या जिल्हय़ातील सातही ह्यबीडीओंह्णवर कारवाई करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे शिफारस करण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. दरम्यान स्थायी समितीच्या सभेला वारंवार गैरहजर राहणार्‍या जिल्हय़ातील ह्यबीडीओंह्णवर कारवाई करण्यासाठी शिफारस करण्याचा ठराव सभेत मंजूर झाल्यानंतर, लगेच जिल्हय़ातील पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी (बीडीओ ) व सहायक गटविकास अधिकारी (एबीडीओ) सभागृहात हजर झाले.जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांवर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन केव्हा करणार, याबाबत सभेत विचारणा करण्यात आली. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून, सोमवार, २३ ऑगस्ट रोजी पंचायत समिती स्तरावर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी उन्हाळे यांनी सभेत दिली.कृषी विभागाच्या योजनेंतर्गत लाभार्थी याद्या मंजूर करण्यात आल्या; मात्र साहित्य वाटपाचे काय झाले, असा प्रश्न सदस्य रामदास लांडे यांनी उपस्थित केला. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे, कृषी सभापती माधुरी गावंडे यांच्यासह समितीचे सदस्य विजय लव्हाळे, शोभा शेळके, दामोदर जगताप, रामदास लांडे, डॉ. हिंमत घाटोळ, गजानन उंबरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा सभेचे सचिव विलास खिल्लारे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.बीडीओंकडून मागविणार खुलासा-डीसीईओजिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेला वारंवार गैरहजर राहिलेल्या जिल्हय़ातील पंचायत समितींच्या गटविकास अधिकार्‍यांना नोटीस बजावून खुलासा मागविण्यात येणार आहे. स्थायी समितीच्या सभेला आतापर्यंत गैरहजर का राहिले, याबाबत उत्तर मागविण्यात येणार आहे, अशी माहिती सभेचे सचिव तथा सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (डीसीईओ) विलास खिल्लारे यांनी सभेत दिली.