शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग प्रकल्पग्रस्तांसाठी १९ कोटीचा निधी प्राप्त

By admin | Updated: October 23, 2014 00:06 IST

राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणासाठी भूमी अधिग्रहणातील निधीचा वाटप.

मलकापूर (बुलडाणा) : गेल्या २ वर्षापासून प्रलंबित पडलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणाकरिता प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणारा मोबदला अखेर वाढीव दराने सुमारे १९ कोटी रुपयांचा निधी भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे. त्यामुळे लवकरच प्रकल्पग्रस्तांना या निधीचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ.दिनेशचंद्र वानखेडे तथा राष्ट्रीय महामार्ग संघर्ष समितीचे अध्यक्ष सुभाषराव पाटील यांनी दिली, आहे.नागपूर ते मुंबई महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणाचे काम नागपूर ते अमरावती व धुळे ते मुंबईपर्यंत पूर्णत्वात गेलेले आहे. मात्र अमरावती ते जळगाव खान्देशपर्यंत काही तांत्रिक बाबी तथा नजरचुकीने झालेल्या सर्वेक्षणामुळे व वाढीव मोबदला देण्याच्या कारणास्तव महामार्गाच्या कामाचे भिजत घोंगडे पडले होते. याबाबत राष्ट्रीय महामार्ग संघर्ष समितीचे अध्यक्ष सुभाषराव पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी शेतकर्‍यांना वाढीव दराने मोबदला मिळावा ही मागणी लावून धरली होती. ५ दिवसांपूर्वी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आदेशान्वये सदर प्रकल्पांना देण्यात येणारी १९ कोटी रुपये मोबदल्याची रक्कम भूसंपादन अधिकारी महामार्ग तथा उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. सदर रककम मलकापूर व नांदुरा शहर सोडून मलकापूर तालुक्यातील रणथम, विवरा, दसरखेड, तालसवाडा, तांदुळवाडी, लहे खु., धरणगाव, बहापुरा, वाघुळ तर नांदुरा तालुक्यातील नांदुरा बु., सांगवा, अंभोडा, नायगाव, कोलासर, धानोरा विटाळी, गोंधनखेड, वडी, खुदानपूर, वडनेर-१, वडनेर -२, रसुलपूर या गावातील महामार्गावर असलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकरी, उद्योजक, व्यावसायिक, लघुउद्योजक, हॉटेल मालक, ढाबे यांचा समावेश आहे. महामार्गावरील प्रकल्पग्रस्तांकरिता देण्यात येणारा वाढीव मोबदल्याची रक्कम १९ कोटी रुपये जमा झाली असून ती रक्कम येत्या १५ ते २0 दिवसांमध्ये प्रशासकीय प्रक्रीया पूर्ण करुन ती रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याचे मलकापूर येथील भूसंपादन अधिकारी महामार्ग तथा उपविभागीय अधिकारी डॉ.दिनेशचंद्र वानखेडे यांनी सांगीतले.