शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
2
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
3
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
4
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
5
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
6
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
7
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
8
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
9
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
10
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
11
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
12
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
13
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
14
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
15
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
16
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
17
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
18
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
19
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
20
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
Daily Top 2Weekly Top 5

रास्तभाव दुकाने बंद ठेवणार

By admin | Updated: May 12, 2014 22:26 IST

स्वस्त धान्य दुकानदार, केरोसीन परवानाधारक संघटनेचा इशारा

अकोला : विविध मागण्या मान्य करण्यात याव्या,अन्यथा येत्या ५ जूनपासून जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकाने आणि परवानाधारक किरकोळ रॉकेल विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत, असा इशारा अकोला जिल्हा सरकारी स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


अकोला शहर व तालुक्यात गेल्या महिनाभरापासून बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना गहू व तांदूळ वितरित करण्यासाठी धान्याचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांच्या रोषाचा सामना रास्तभाव दुकानदारांना करावा लागत आहे. त्यामुळे शासकीय धान्य गोदामात त्वरित धान्याचा पुरवठा करण्यात यावा तसेच शालेय पोषण आहार वितरणापोटी जिल्ह्यातील रास्तभाव दुकानदारांचे लाखो रुपये विना विलंब देण्यात यावे, जिल्ह्यात रॉकेलचा पुरवठा ५० टक्के देण्यात यावा व रॉकेल विक्रीवर प्रती लीटर १ रुपयाप्रमाणे कमिशन देण्यात यावे, रोहयो अंतर्गत कुपनांची थकबाकी रास्तभाव दुकानदारांना देेण्यात यावी, महिन्याच्या सुरुवातीला शिधापत्रिकाधारकांना रॉकेलचे वितरण करण्यात यावे इत्यादी मागण्या मान्य न केल्यास येत्या ५ जूनपासून जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकाने, रॉकेल हॉकर्स व किरकोळ रॉकेल परवानाधारक दुकाने बंद ठेवणार आहेत, असा इशारा अकोला जिल्हा सरकारी स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न मुंडे, उपाध्यक्ष मो. आरीफ मो. अश्फाक, हॉकर युनियन अध्यक्ष सै. यासिन ऊर्फ बब्बुभाई, अकोला तालुका अध्यक्ष अनिता देशमुख यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.