शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

रमाई घरकुलचे मनपात ३६ कोटी ३0 लक्ष पडून

By admin | Updated: October 28, 2014 00:57 IST

घरकुल बांधण्यासाठी अकोला मनपाला प्राप्त ३६ कोटी ३0 लाखांचे अनुदान प्राप्त, मात्र ठोस नियोजनाचा अभाव.

अकोला : मनपा क्षेत्रातील दारिद्रय़रेषेखालील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील लोकांच्या घराचे स्वप्न आचारसंहितेमुळे लांबणीवर गेले. रमाई आवास (घरकुल) योजनेंतर्ग त घरकुल बांधण्यासाठी मनपाला प्राप्त ३६ कोटी ३0 लाखांचे अनुदान ठोस नियोजनाअभावी पडून आहे. शिवाय, २२६ कामांच्या फाइलवर आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी स्वाक्षरी न केल्यामुळे संबंधित कामे रखडल्याचे चित्र तूर्त दिसत आहे. महापालिका हद्दीतील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई आवास (घरकुल) योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांचे बांधकाम मागील चार वर्षांपासून रखडले आहे. सन २00९-१0 मध्ये या योजनेंतर्गत १३३ घरकुलांच्या बांधकामाला परवानगी मिळाली. परंतु, घरकुलाची रक्कम वाढल्यामुळे व निधीअभावी या घरकुलांचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. यानंतर मनपाला समाजकल्याण विभागाकडून २२६ पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले. या व्यतिरिक्त सर्वेक्षण झालेल्या ६00 पेक्षा जास्त घरकुलांचे प्रस्ताव अडगळीत पडून आहेत. शासनाकडून अकोला मनपाला १ हजार ५७५ घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले असून, याकरिता पहिल्या टप्प्यात ३१ कोटी ५0 लाख अनुदान प्राप्त झाले. त्यानंतर पुन्हा ४ कोटी ८0 लाख मिळाले. अशा एकूण ३६ कोटी ३0 लाखांपैकी मनपाने २६ कोटी बँकेत डिपॉझिट केले. परंतु, अद्यापही पहिल्या टप्प्यातील १३३ व दुसर्‍या टप्प्यातील २२६ कामे नियोजनाअभावी रखडल्याची स्थिती आहे. कोट्यवधीचा निधी मनपात पडून असतानादे खील गोरगरिबांना त्यांच्या हक्काच्या घरापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. आचारसंहिता संपल्यामुळे प्रशासनासह सत्तापक्षाने यावर तात्काळ निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.

२६ कोटींची ठेव; व्याज नाही!

     घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्राप्त अनुदानातून मनपाने २६ कोटी रुपये बँकेत ह्यडि पॉझिटह्ण ठेवले आहेत. एवढी मोठी रकम बँकेत ठेव असली तरी त्यापासून मिळणार्‍या व्याजाचा लाभ मात्र प्रशासनाला घेता येणार नसल्याची माहिती आहे. संबंधित व्याजाची र क्कम नियमानुसार शासनाकडे परत करावी लागणार आहे.