परतीचा पाऊस लांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:39 PM2019-09-30T12:39:35+5:302019-09-30T12:39:47+5:30

येत्या ३ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यात तुरळक स्वरू पाचा पाऊस होण्याचीही शक्यता वर्तविली आहे.

Rainy season extendet till october | परतीचा पाऊस लांबला

परतीचा पाऊस लांबला

Next

अकोला : परतीच्या पावसाचा मुक्काम लांबल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असला तरी साधारणत: ३० सप्टेंबरपर्यंत ईशान्य पाऊस आपल्याकडे पडतो. त्यामुळे येत्या ३ आॅक्टोबरनंतर परतीच्या पावसाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता कृषी हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
महाराष्टÑातील मराठवाडा, पश्चिम विदर्भातील एक-दोन जिल्हे सोडल्यास सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली. वर्तमान स्थितीत उत्तर भारतात पावसाने थैमान घातले आहे. राज्यात सध्या पडणाऱ्या पावसासोबत विजांचा कडकडाट होत असल्याने हा परतीचा पाऊस असावा, असा नागरिकांचा समज आहे; परंतु हा पोष्ट मान्सून असून, ३० सप्टेंबर या स्वरू पाचा पाऊस होत असतो. त्यामुळे परतीच्या पावसाचे चित्र स्पष्ट होण्यासाठी सर्वांनाच ३ आॅक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती पुण्याचे ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. आर. एन. साबळे यांनी दिली.
दरम्यान, गत चोवीस तासांत रविवार, २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजतापर्यंत विदर्भात गोंदिया येथे सर्वाधिक ७८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. अकोला येथे २५.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, अमरावती येथे ३.८ मि.मी. तर नागपूर येथे ९ मि.मी. पाऊस पडला. अकोला जिल्ह्यात सोमवार, ३० सप्टेंबर रोजी बºयापैकी पाऊस पडण्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविला असून, येत्या ३ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यात तुरळक स्वरू पाचा पाऊस होण्याचीही शक्यता वर्तविली आहे.


पाऊस थांबला तरच कापूस हाती येणार!
विदर्भात कपाशी पिकाचे क्षेत्र यावर्षी वाढले आहे; पण सतत पाऊस सुरू असल्याने पिके हातची जाण्याची शक्यता असून, सततच्या पावसामुळे कापसाची बोंडे काळवंडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यात यावर्षी ४१ लाख ९० हेक्टरवर कपाशी असून, विदर्भात १७ लाख हेक्टरवर शेतकºयांनी पेरणी केली आहे; परंतु यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून सतत पाऊस सुरू असल्याने शेतकºयांना शेतीचे व्यवस्थापन करण्यास पाऊस वेळच देत नसल्याने तण आणि कि डींचा प्रादुर्भाव वाढला आहे. वातावरणात आर्द्रता असून, शेतात पाणी साचल्याने प्रचंड ओल आहे. परिणामी, कपाशीच्या मुळांना सूर्यप्रकाश व अन्नद्रव्य पोहोचत नसल्याने कपाशीची मुळे सडण्याचे प्रकार घडत आहेत. शेतातून पाण्याचा निचरा होत नसून, अनेक ठिकाणी झाडाच्या पात्या गळाल्या आहेत.


कापूस धरलेली बोंडे काळवंडताना दिसत आहेत. यावर्षी पावसाला उशिरा सुरुवात झाली.त्यानंतर चार आठवड्यांचा खंड पडला. परंतु सप्टेंबर महिन्यात सतत पाऊस सुरू असून, सर्वच पिकांना त्याची झळ बसली आहे. सोयाबीनची तर अनेक ठिकाणी पाने गळाली असून, शेंगाही गळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे कपाशी आणि सोयाबीन पीक हातचे जाण्याची शक्यता वाढल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.

वातावरणात आर्द्रता असून, जमिनीत ओल आहे. सूर्यप्रकाशाचे तास कमी पडत आहेत. मुळांना अन्नद्रव्य पोहोचत नसल्याने कपाशी झाडाच्या खालची बोंडे काळी पडत आहेत. काही ठिकाणी कपाशीची पाने गळून पडत असल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. शेतकºयांनी यावर शिफारशीनुसार उपाययोजना करावी.
- डॉ. मोहनराव खाकरे,
ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ तथा माजी विद्यावेत्ता, डॉ. पंदेकृवि.

Web Title: Rainy season extendet till october

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.