शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी अर्जांचा पाऊस

By admin | Updated: July 20, 2015 23:55 IST

बुलडाणा जिल्ह्यात ५२१ ग्रामपंचायतींसाठी उशिरापर्यंत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया.

बुलडाणा : जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायतींच्या ४ हजार ८0२ जागांसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना तहसील कार्यालयावर अर्जांचा अक्षरश: पाऊस पडला. जिल्ह्यात एकूण १४ हजार ३४७ अर्ज दाखल झाले असून, रात्री उशिरापर्यंत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच होती. सर्वसाधारण निवडणुकीसोबतच पोटनिवडणूकही होत असल्याने या जागांवरही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली होती. या संपूर्ण प्रक्रियेसाठी प्रशासनाची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.

*निवडणूकआयोगाने वेळ वाढवून दिला

   ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रथमच ऑनलाइन अर्ज दाखल होत असल्याने उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडाली. रिमझिम पाऊस, इंटरनेटच्या कनेक्टीव्हीटीचा प्रश्न यामुळे उमेदवारांचा वेळेत अर्ज दाखल करण्यासाठी जीव टांगणीला लागला होता. सर्वच तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारांची झुंबड उडाली होती. याची दखल घेत निवडणूक आयोगामार्फत उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी एक तासाचा वेळ वाढवून देण्यात आला. अनेक उमेदवारांना दिलासा मिळाला. चिखलीमध्ये रात्री उशिरापर्यंत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती तहसीलच्या सूत्रांनी १७५0 अर्ज दाखल झाल्याचे सांगितले; मात्र अधिकृत अर्जाचा आकडा वृत्त लिहेपर्यंत मिळाला नाही.

*ऑफलाईन अर्जही स्वीकारले !

         निवडणूक आयोगाने एक तासाची वेळ वाढवून दिली; मात्र ऑनलाइनचा घोळ मिटता मिटत नसल्याने शेवटच्या एक तासात लोणार तहसील कार्यालयात ऑफलाइन अर्जही स्वीकारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांना अल्प प्रतिसाद दुष्काळी परिस्थितीमुळे निवडणुका अविरोध करण्याचा प्रयत्न जोरकसपणे झाला नाही तळणी, वरूड, सिंदखेड मातला, कंडारी, भंडारी शिवाजीनगर व पांगरखेड, नांदुरामधील रसुलपूर या ग्रामपंचायती अविरोध झाल्या आहेत.

*अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी

        अनेक ग्रामपंचायतमध्ये निवडणूक अविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले;मात्र अंतिम क्षणी काही इच्छुकांनी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केल्याने अशा इच्छुकांची गावातील नेते मनधरणी करताना दिसत होते.