लाखपुरी येथील गावठी दारू अड्ड्यावर छापेमारी 

By सचिन राऊत | Updated: March 24, 2024 15:26 IST2024-03-24T15:25:49+5:302024-03-24T15:26:52+5:30

मुर्तीजापूर तालुक्यातील लाखपूरी येथील रहिवासी ओमप्रकाश वैजनाथ कैथवास वय ५० वर्ष हा पूर्णा नदीकाठी गावठी हातभट्टीची दारू काढत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. यावरून पथकाने सापळा रचून छापा टाकला असता या ठिकाणावरून ९० हजार रुपयांची गावठी हातभट्टीची दारू व दहा हजार रुपयांचा इतर मुद्देमाल असा एक लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Raid at Gavathi liquor store in Lakhpuri | लाखपुरी येथील गावठी दारू अड्ड्यावर छापेमारी 

लाखपुरी येथील गावठी दारू अड्ड्यावर छापेमारी 

अकोला : मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाखपुरी येथे पूर्णा नदीकाठी सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी केली. या ठिकाणावरून एक लाख रुपयांचा दारू साठा जप्त करण्यात आला आहे.

मुर्तीजापूर तालुक्यातील लाखपूरी येथील रहिवासी ओमप्रकाश वैजनाथ कैथवास वय ५० वर्ष हा पूर्णा नदीकाठी गावठी हातभट्टीची दारू काढत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. यावरून पथकाने सापळा रचून छापा टाकला असता या ठिकाणावरून ९० हजार रुपयांची गावठी हातभट्टीची दारू व दहा हजार रुपयांचा इतर मुद्देमाल असा एक लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, दशरथ बोरकर, गोकुळ चव्हाण, अन्सार अहमद, लीलाधर खंडारे, विजय कबले यांनी केली.

Web Title: Raid at Gavathi liquor store in Lakhpuri