शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींना अटक; काँग्रेसचा अकोल्यात रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 10:41 IST

Congress Akola Agitation : गुरुवारी वाशिम बायपास चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील दलित युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पीडित युवतीच्या कुटुंबाची भेट घेण्यापूर्वीच अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ मनपा विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वात गुरुवारी वाशिम बायपास चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जिया पटेल यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली.हाथरस येथील निर्भयावर स्थानिक चार युवकांनी सामूहिकरीत्या बलात्कार करून तिला शेतात फेकून दिले. या दरम्यान निर्भयाचा अतोनात शारीरिक छळ करून गंभीररीत्या जखमी केल्याचे समोर आले. घटनेच्या पंधरा दिवसांनंतर उपचारादम्यान पीडितेचा रुग्णालयात मृत्यू झाला. तिच्या कुटुंबाने अंत्यसंस्कार करण्यासाठी विनवणी करूनसुद्धा पोलिसांनी मध्यरात्री घाईघाईने परस्पर पीडित युवतीचे अंत्यसंस्कार उरकवून टाकले.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी गुरुवारी पीडित युवतीच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अडवून अटकेची कारवाई केली. या घटनेच्या निषेधार्थ मनपा विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसच्यावतीने उत्तर प्रदेश सरकार व मोदी सरकार विरुद्ध घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व अकोला जिल्ह्याचे निरीक्षक जियाभाई पटेल, जिल्हा काँग्रेसचे (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेसagitationआंदोलन