शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा नदीत पुन्हा हिरवं पाणी!

By admin | Updated: November 17, 2014 01:32 IST

म्हैसांगसह सात ते आठ गावात दूषित आणि रसायनयुक्त पाणी, साथरोगाच्या उद्रेकाची भीती.

अकोला- अमरावतीच्या उद्योगांमधील हिरवे आणि रसायनयुक्त घाण पाणी पुन्हा नदीपात्रात सोडण्यात आल्याने रविवारी म्हैसांग परिसरात पूर्णा नदीच्या पात्रात घातक आणि दूषित पाणी वाहून आले. म्हैसांगसह सात ते आठ गावांमध्ये याच पाण्याचा पुरवठा झाल्याने या गावांमध्ये जलजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. तीन ते चार महिन्यापूर्वी पूर्णा नदीला दूषित पाणी येत असल्याने खळबळ उडाली होती. आता पुन्हा अमरावती येथील उद्योगांमधील घाण पाणी पूर्णा नदीत सोडण्यात येत असल्याने हे हिरवे आणि घातक पाणी म्हैसांग परिसरात आले आहे. महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळ अमरावती येथील उद्योगांमधील हिरवे आणि रसायनयुक्त घाण आणि दूषित पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असून, हेच पाणी पुढे पूर्णा नदीच्या पात्रात येत आहे. या नदीतील पाण्याचा पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी उपयोग म्हैसांग, दोनवाडा, एकलारा, पारद, सांगवामेळ, घुंगशी-मुंगशी, कट्यार, वडद, कपिलेश्‍वर, काटी-पाटी, केळीवेळी, गांधीग्रामसह आठ ते दहा गावांमध्ये करण्यात येतो. रविवारी पूर्णा नदीच्या पात्रात पुन्हा रसायनयुक्त हिरवे पाणी आल्याने म्हैसांगसह बहुतांश गावात या पाण्याचा पिण्यासाठी वापर करण्यात आला. त्यामुळे जलजन्य आजारांचा धोका निर्माण झाला असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी या गावातील नागरिकांनी केली आहे.