शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक ठिकाणी टायर जाळण्यास बंदी

By admin | Updated: November 19, 2014 02:01 IST

विषारी वायूचे मानवी जीवनावर घातक परिणाम.

सचिन राऊत / अकोलाअशास्त्रीय पद्धतीने मोकळ्या जागेत टायर जाळल्याने मोठय़ा प्रमाणात विषारी वायूची निर्मिती होते. त्याचे घातक परिणाम मनुष्यासह पर्यावरणावरही होत असून, याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अहवाल दिल्यानंतर, अशाप्रकारे टायर जाळण्यावर बंदी घालण्यात आली आहे.मोकळया जागेत टायर जाळल्याने मोठय़ा प्रमाणावर विषारी वायू वातावरणात पसरतात. याचे मानवी आरोग्यावर प्रचंड घातक परिणाम होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्य सरकारला सार्वजनिक ठिकाणी टायर जाळण्यास प्रतिबंध करण्यासाठी योग्य ती अधिसूचना जारी करण्याची शिफारस केली होती. यावरून मुंबई पोलिस कायदा, फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रात टायर जाळण्यास बंदी घालण्यासाठी योग्य कारवाई करता यावी, यासाठी प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमानुसार वायुप्रदूषण क्षेत्रामध्ये टायर जाळण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे. तद्वतच, पुणे खंडपीठाच्या हरित लवादानेही ९ सप्टेंबर रोजी गृह, तसेच महसूल विभागाला आदेश देऊन सार्वजनिक ठिकाणी टायर जाळण्यास प्रतिबंध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यापृष्ठभूमिवर हा निर्णय घेण्यात आला असून, यापुढे सार्वजनिक ठिकाणी टायर जाळणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राजीव मित्तल यांनी दिला आहे.