शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
5
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
6
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
9
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
10
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
11
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
12
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
13
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
14
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
15
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
16
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
17
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
18
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
19
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
20
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी नैपुण्य चाचणी

By admin | Updated: June 28, 2014 20:57 IST

राज्यात विविध ठिकाणी क्रीडा प्रबोधिनीतप्रवेश देण्यासाठी ८ ते १४ वर्ष वयोगटातील मुला-मुलींची क्रीडा नैपुण्य चाचणी घेण्यात येणार आहे.

अकोला: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत महाराष्ट्र शारीरिक शिक्षण व क्रीडा क्षेत्राचा दर्जा उंचावण्यासाठी आणि राज्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्यासाठी शिवछत्रपती क्रीडापीठ, पुणे अंतर्गत राज्यात विविध ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी सुरू आहेत. यामध्ये प्रवेश देण्यासाठी राज्यातील ८ ते १४ वर्ष वयोगटातील मुला-मुलींची क्रीडा नैपुण्य चाचणी घेण्यात येणार आहे.

अकोला जिल्‘ात ७ जुलैपासून शाळा स्तरावर क्रीडा नैपुण्य चाचणीचे आयोजन केले आहे. सन २०१४-१५ करिता विविध क्रीडा प्रबोधिनीमध्ये नवीन प्रवेश देण्यासाठी शाळेत शिकत असलेले तसेच शाळेत शिकत नसलेल्या; परंतु उत्कृष्ट शारीरिक क्षमता असलेल्या मुला-मुलींची क्रीडा नैपुण्य चाचणी घेण्यात येईल. यामध्ये वजन, उंची, ३० मी. धावणे, ८०० मी. धावणे, ६ बाय १० शटल रन, उभे राहून लांबउडी, उभे राहून उंचउडी, मेडिसीन बॉल थ्रो, लवचिकता या नऊ चाचण्या द्याव्या लागतील.
अकोला जिल्ह्यातील सर्व शाळा, प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग अंतर्गत येणार्‍या आश्रम शाळा, वसतिगृह, समाजकल्याण विभागामार्फत चालविण्यात येणार्‍या शाळेतही चाचणी घेण्यात येईल. जिल्हा स्तरावर नऊ चाचण्यामध्ये १७ किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणे खेळाडूंना आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वसंत देसाई क्रीडांगण येथे संपर्क साधावा. शाळा स्तरावर ७ जुलै रोजी आयोजन होईल. १५ जुलै रोजी मूर्तिजापूर, आकोट, तेल्हारा, १६ जुलै बाळापूर, पातूर, १७ जुलै बार्शीटाकळी, अकोला तालुका स्तर व १८ जुलै रोजी अकोला मनपा स्तर चाचणी घेण्यात येईल. जिल्हा स्तर चाचणी २५ जुलै रोजी होईल, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी दिली.