शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

‘आॅटोडीसीआर’ची प्रक्रिया खोळंबली; ‘ड’वर्ग महापालिकांचे कामकाज प्रभावित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:43 PM

महाआयटी विभागाने नियुक्त केलेल्या एजन्सीने कामकाज सुरू न केल्याने ‘ड’वर्ग महापालिकांचे कामकाज प्रभावित झाल्याचे चित्र समोर आले आहे.

अकोला : राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांनी त्यांच्या स्तरावर इमारतीचा नकाशा मंजूर करण्यासाठी ‘आॅटोडीसीआर’ प्रणाली कार्यान्वित करीत खासगी कंपन्यांना कंत्राट दिला होता. संबंधित कंपन्यांच्या प्रणालीतील त्रुटींमुळे विविध समस्या निर्माण होत असल्याचे लक्षात घेता माहिती व तंत्रज्ञान विभागाने खासगी कंपन्यांचे कंत्राट रद्द करून शासनाच्या महाआयटी विभागाची यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश नगर विकास विभागाने दिले होते. मागील आठ महिन्यांपासून महाआयटी विभागाने नियुक्त केलेल्या एजन्सीने कामकाज सुरू न केल्याने ‘ड’वर्ग महापालिकांचे कामकाज प्रभावित झाल्याचे चित्र समोर आले आहे.शहरात व्यावसायिक संकुल, रहिवासी इमारती किंवा घरे बांधण्यासाठी मनपाच्या नगररचना विभागाकडून नकाशा मंजूर करणे क्रमप्राप्त आहे. या विभागाकडे नकाशा मंजुरीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर पहिल्यांदा जोत्यापर्यंत (प्लिंथ) बांधकामाची परवानगी दिली जाते. जोत्यापर्यंत बांधकाम पूर्ण केल्यावर पुढील बांधकामासाठी पुन्हा नगररचना विभागाची परवानगी आवश्यक ठरते. या दरम्यान, नकाशा सादर करताना प्लॉटचे क्षेत्रफळ, कृषक-अकृषक असण्यासोबतच शिट क्रमांक आदी इत्थंभूत माहिती कागदोपत्री सादर करावी लागत होती. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळे ‘ड’ वर्ग महापालिकांनी त्यांच्या स्तरावर नकाशा मंजुरीसाठी ‘आॅटोडीसीआर’ प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. आॅटोडीसीआर पद्धतीनुसार मालमत्ताधारकाला आर्किटेक्टच्या सहाय्याने आॅनलाइन अर्ज सादर करणे भाग आहे. त्यासाठी महापालिकांनी रीतसर आर्किटेक्ट, अभियंत्यांची निवड केली. अकोला महापालिका प्रशासनाने ‘आॅटोडीसीआर’चा कंत्राट पुणे येथील इन्फोटेक कंपनीला दिला. ही प्रणाली कार्यान्वित केल्यानंतर नकाशा मंजुरीची कामे झटपट निकाली निघतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात ही सर्व प्रक्रिया वेळखाऊ व खर्चिक असल्याने नकाशा मंजुरीची कामे प्रभावित झाली होती. ही बाब लक्षात घेता राज्यातील ‘ड’वर्ग महापालिकांसाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाने खासगी कंपन्यांचे कंत्राट रद्द करून शासनाच्या महाआयटी विभागाची यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले होते. मागील आठ महिन्यांपासून महाआयटी विभागाने नियुक्त केलेल्या एजन्सीने कामकाज सुरू केलेले नाही.

महाआयटी विभागाने नियुक्त केलेल्या एजन्सीने तातडीने कामकाज सुरू करावे,यासाठी आम्ही संपकर् ात आहोत. जेणेकरून नकाशा मंजुरीची कामे निकाली निघतील. १ सप्टेंबरपासून ही यंत्रणा कार्यरत होण्याची अपेक्षा आहे.-जितेंद्र वाघ आयुक्त मनपा,अकोला.एजन्सीची केली नियुक्ती!शासनाच्या महाआयटी विभागाने ‘आॅटोडीसीआर’चे निकष तयार केले आहेत. त्यासाठी ‘ड’वर्ग मनपाच्या स्तरावर एजन्सीच्या प्रतिनिधीची नियुक्ती केली जाईल. त्याचे वेतन मनपा प्रशासनाला अदा करावे लागणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका