शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

आंबेडकरांशी आघाडीला प्राधान्य, अन्यथा उमेदवार तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 2:07 PM

अ‍ॅड. आंबेडकरांसोबत आघाडी होत नसेल तर काँग्रेसचा उमेदवार तयार असून, इच्छुकांची संख्या वाढतीच आहे, असा सूर शुक्रवारी प्रदेश काँग्रेस कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत उमटला.

अकोला: भारिप बमसंचे संस्थापक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आघाडी करून त्यांना अकोला लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यास प्राधान्य द्यावे, अ‍ॅड. आंबेडकरांसोबत आघाडी होत नसेल तर काँग्रेसचा उमेदवार तयार असून, इच्छुकांची संख्या वाढतीच आहे, असा सूर शुक्रवारी प्रदेश काँग्रेस कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत उमटला. लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर अकोला लोकसभा मतदारसंघाच्या स्थितीबाबत शुक्रवार १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत आढावा घेतला गेला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्टÑातील सर्व लोकसभा मतदारसंघांचा प्रदेशनिहाय आढावा १५ नोव्हेंबरपासून घेतला जात आहे. १६ नोव्हेंबरला अकोला लोकसभा मतदारसंघासंदर्भात आढावा घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे सहप्रभारी आशीष दुवा, विधानसभेचे विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे उपनेता विजय वडेट्टीवार, खासदार राजीव सातव, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, आरिफ नसीम खान आदी मान्यवर उपस्थित होते.अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाला थांबविण्यासाठी काँग्रेसला अ‍ॅड. आंबेडकरांची साथ हवी आहे. यापूर्वी १९९८ व १९९९ मध्ये काँग्रेस सोबत अ‍ॅड. आंबेडकरांनी आघाडी करून यश मिळविले होते. त्यांची पुनरावृत्ती २०१९ च्या निवडणुकीत व्हावी असा मानस या बैठकीत व्यक्त करण्यात आला. आंबेडकरांसोबत आघाडीसाठी काँग्रेसही इच्छुक आहे; मात्र आता आंबेडकरांनी एमआयएम सोबत आघाडीचा पवित्रा घेतल्याने आघाडीचा चेंडू हायकमांडच्या कोर्टात आहे. त्यामुळे आघाडी शक्य झाली नाही तर नवा चेहरा आता उमेदवार म्हणून द्यावा, असाही प्रस्ताव या बैठकीत ठेवण्यात आला. या आढावा बैठकीला जिल्ह्यातील काँग्रेसचे महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, माजी आमदार सुधाकरराव गणगणे, नातिकोद्दीन खतीब, प्रदेश महासचिव मदन भरगड, प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, महापालिकेचे विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दादाराव मते पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणcongressकाँग्रेसPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर