अकोल्यात प्रकाश जावडेकर यांच्या प्रतिमेला चपलांचा मार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 17:16 IST2018-09-15T17:15:41+5:302018-09-15T17:16:06+5:30

अकोल्यात प्रकाश जावडेकर यांच्या प्रतिमेला चपलांचा मार!
अकोल्यात प्रकाश जावडेकर यांच्या प्रतिमेला चपलांचा मार!
अकोला : शाळांनी सरकारकडे अनुदान मागण्यापेक्षा माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक सहाय्य मागावे, या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या विधानाचा अकोल्यात शनिवारी तीव्र निषेध करण्यात आला. भारिप-बमसं प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या सदस्यांनी टॉवर चौकात प्रकाश जावडेकर यांच्या प्रतिमेला चपलांचा मार देत जोरदार निदर्शने केली.