विदर्भात तीन दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 14:14 IST2019-06-16T14:14:36+5:302019-06-16T14:14:43+5:30
सोसाट्याच्या वाºयासह पावसाची शक्यता कृषी हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

विदर्भात तीन दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता !
अकोला : विदर्भात १६ जून ते १८ जूनपर्यंत तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाºयासह पावसाची शक्यता कृषी हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
सोसाट्याच्या वाºयासह पाऊस येण्याची शक्यता असल्याने तयार झालेल्या मालाची शेतकऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी साठवणूक करण्याचा सल्ला कृषी हवामान केंद्राच्यावतीने देण्यात आला आहे, तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने एक वर्षाच्या आतील लागवड केलेल्या फळपिकांचे कलमे व रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठीची काळजी घेण्याचा सल्लाही प्रादेशिक कृषी हवामान केंद्राने दिला आहे.