दारू पिऊन धिंगाणा घालणारा पोलीस कर्मचारी निलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 12:47 IST2019-11-24T12:46:50+5:302019-11-24T12:47:00+5:30

भरत इंगळे नामक पोलीस कर्मचाºयावर पोलीस ठाण्यात दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा आरोप आहे.

Police officer suspended for drunkenness! | दारू पिऊन धिंगाणा घालणारा पोलीस कर्मचारी निलंबित!

दारू पिऊन धिंगाणा घालणारा पोलीस कर्मचारी निलंबित!

अकोला: डाबकी रोड पोलीस ठाण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याला दारू पिऊन धिंगाणा घालणे चांगलेच अंगलट आले आहे. पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी शनिवारी एका आदेशानुसार त्या पोलीस कर्मचाºयाला निलंबित केले आहे.
डाबकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हे शोध पथकात हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत भरत इंगळे नामक पोलीस कर्मचाºयावर पोलीस ठाण्यात दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा आरोप आहे. त्यांनी २0 नोव्हेंबर रोजी पोलीस ठाण्यात धिंगाणा घालून दारूच्या नशेत अश्लील शिवीगाळसुद्धा केली. यासंदर्भात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनुसार पोलीस अधीक्षक गावकर यांनी पोलीस उपअधीक्षक पाटील यांच्याकडे चौकशी सोपविली होती. चौकशीदरम्यान भरत इंगळे यांनी कर्तव्यावर असताना मद्य प्राशन केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाला गंभीरतेने घेत, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी पोलीस कर्मचारी भरत इंगळे यांना शनिवारी निलंबित केले. (प्रतिनिधी)

Web Title: Police officer suspended for drunkenness!