शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

२६ बिल्डरांविरूद्ध पोलीस तक्रार

By admin | Updated: January 21, 2015 01:14 IST

अकोला शहरातील अनधिकृत बांधकाम प्रकरण; २ जणांविरूद्ध गुन्हा दाखल.

अकोला : शहरातील १८७ निर्माणाधीन इमारतींचे बांधकाम थांबवण्याचे आदेश जारी केल्यानंतर महापालिकेने २६ बांधकाम व्यावसायिकांविरोधात मंगळवारी रात्री विविध पोलीस ठाण्यांमध्ये फ ौजदारी स्वरूपाची तक्रार दाखल केली. याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात २ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मनपा क्षेत्रातील निर्माणाधीन इमारतींचे मोजमाप करण्याचे आदेश मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी नगररचना विभागाला एप्रिल २0१४ मध्ये दिले होते. यामध्ये १८७ इमारतींचे मोजमाप नियमापेक्षा जास्त असल्याचे आढळून आल्यानंतर बांधकाम बंद करण्याचे निर्देश डॉ. कल्याणकर यांनी दिले. नगररचना विभागाने नियमानुसार नकाशा मंजूर करण्याचे आदेश कल्याणकरांनी दिल्यानंतर नऊ महिन्यांमध्ये अवघे १३ नकाशे मंजूर करण्यात आले. यातही वैयक्तिक बांधकाम नकाशांचा समावेश आहे. या दरम्यान संबंधित व्यावसायिकांनी अतिरिक्त बांधकाम स्वत:हून काढावे, अन्यथा मनपाकडून पाडले जाणार असल्याबाबत नोटीस नगररचना विभागाने जारी केल्या होत्या. यामध्ये अनेक बांधकाम व्यावसायिकांनी नोटीसला उत्तरच दिले नाही. त्यामुळे नगररचना विभागाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५२, ५३ अन्वये पोलिसांत फौजदारी स्वरूपाची तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. सिव्हिल लाईन पोलीसांनी अनिल चौधरी व सौरभ अग्रवाल यांच्याविरूद्ध अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.पूर्व झोनचे क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, पश्‍चिमचे क्षेत्रीय अधिकारी वासुदेव वाघाडकर, उत्तर झोनचे अधिकारी राजेंद्र घनबहाद्दुर व दक्षिणचे झोन अधिकारी कैलास पुंडे यांनी मंगळवारी रात्री २६ बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात झोननिहाय पोलीस तक्रारी केल्या. ही माहिती कानावर येताच संबंधित व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, जामिनासाठी धावपळ सुरू झाली आहे. केड्राईचे अध्यक्ष पंकज कोठारी यांनी अकोला मनपासाठी स्वतंत्र बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीचा (डीसी रूल) प्रस्ताव नुकताच शासनाकडे सादर करण्यात आला असून या मुद्दय़ावर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकीला आम्ही उपस्थित होतो. हा प्रस्ताव लागू झाल्यास ८0 बांधकामांना दिलासा मिळू शकतो. अशा स्थितीत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे मोठा धक्का बसला असल्याचे त्यांनी सांगीतले. तर मनपाचे , साहाय्यक नगर रचनाकार संदीप गावंडे यांनी मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५२, ५३ अन्वये फौजदारी तक्रार करण्यात आली. टप्प्याटप्प्याने सर्व बांधकाम व्यावसायिकांविरोधात तक्रारी नोंदवल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले.