शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

हुल्लडबाजी करणा-यांना पोलीस घेणार ताब्यात

By admin | Updated: March 5, 2015 01:59 IST

रंगपंचमीला विचित्र आवाज काढणा-यांवरही कारवाई.

अकोला: रंगपंचमीच्या पृष्ठभूमीवर शहरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलीस कर्मचारी तैनात करण्यासोबतच ह्यगुड मॉर्निंगह्ण पथकही गस्त घालणार आहे. रंगपंचमीला दरवर्षी घडणारे गुन्हे लक्षात घेता, जवळपास ८00 च्यावर पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान शहरात तैनात करण्यात येणार आहेत. विशेषत: रंगपंचमीला हुल्लडबाजी करणार्‍या टवाळखोरांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. रस्ते, चौकात हुल्लडबाजी करणारे, मद्य प्राशन करून फिरणार्‍यांना पोलीस थेट ताब्यातच घेणार आहेत. होळी, रंगपंचमीला दारू, अंमली पदार्थांचे सेवन करून हाणामार्‍या, छेडखानी, वादाचे प्रकार घडतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले. ५ मार्च रोजीची रंगपंचमी, ६ मार्चला धूलिवंदन आणि ८ मार्चला शिवजयंती या पृष्ठभूमीवर शहरात तगडा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. यासोबतच वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. होळी, रंगपंचमीला दारू पिऊन वाहन चालविणे, विचित्र आवाज काढणे, छेड काढणे, पाण्याचे फुगे मारणे, दंगामस्ती करणार्‍यांना पोलीस ताब्यात घेणार आहेत. या दरम्यान महिला व तरुणींच्या सुरक्षेकडे पोलीस विशेष लक्ष ठेवणार आहेत. याशिवाय धार्मिक स्थळांची पवित्रता राखण्यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात येईल. ५ व ६ मार्चच्या रात्री सर्व पोलीस ठाण्यांचे ठाणेदार आपल्या पथकातील कर्मचार्‍यांसह रात्रीची गस्त घालणार आहेत.