शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
5
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
6
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
7
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
8
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
10
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
11
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
12
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
13
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
14
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
15
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
16
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
17
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
18
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
19
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
20
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
Daily Top 2Weekly Top 5

दुस-या दिवशीही पोलिसांची कारवाई

By admin | Updated: January 8, 2015 00:44 IST

सिंधी कॅम्प, खदान परिसरातील अनधिकृत फलक, झेंडे हटविले.

अकोला : अनधिकृत फलक, झेंडे, नामफलक, होर्डिंग्ज काढण्यासाठी मंगळवारी पोलिसांनी मोहीम सुरू केली. या मोहिमेंतर्गत बुधवारीसुद्धा पोलीस व महापालिकेने सिंधी कॅम्प, खदान परिसरात कारवाई करून अनधिकृत फलक, झेंडे, दुकानांवरील बोर्ड काढून टाकले. ही कारवाई दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू होती.शहरातील खदान, सिंधी कॅम्प परिसरातील इमारती, दुकानांवरील फलकांसह चौकातील नामफलक, झेंडे, पताका तसेच रस्त्यावर केलेले दुकानांचे अतिक्रमण बुधवारी पोलीस पथक व महापालिकेने गजराजाच्या माध्यमातून हटविले. सिंधी कॅम्प परिसरात पथक दाखल होण्यापूर्वी सामाजिक व धार्मिक संघटनेचे पदाधिकारी, नागरिक व व्यापार्‍यांनी त्यांच्या दुकाने, इमारतींवरील फलक, झेंडे, पताका स्वत:हून काढून टाकले. मंगळवारी पथकाने धडाक्यात मोहीम राबवून अनधिकृत फलकांच्या विळख्यातून परिसराची मुक्तता केली. पोलीस पथक व महापालिकेने शहरातील जठारपेठ, राऊतवाडी, रणपिसेनगर, रामनगर, जवाहरनगर, रामदासपेठ, रेल्वे स्टेशन, निबंधे प्लॉट, लहान उमरी, वृंदावननगर, बसस्टँड, अशोक वाटिका, गोरक्षण रोड, इन्कमटॅक्स चौक, तुकाराम चौक, मलकापूर, गौतमनगर, कृषिनगर, कौलखेड, शिवणी, खरप, खडकी, भौरद, न्यू तापडियानगर, डाबकी रोड, जुने शहर, हरिहरपेठ, वाशिम बायपास, बाळापूर नाका आदी भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात रस्त्यांवर झेंडे, पताका, चौकांमधील नामफलक आहेत. यासोबतच इमारती, दुकाने, विद्युत खांब, वृक्षांवर बॅनर, होर्डिग्ज लावण्यात आले आहेत. या भागांमध्येही टप्याटप्प्याने मोहीम राबवून अनधिकृत फलक काढण्याची मागणी होत आहे.