शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
3
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
4
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
5
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
6
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
7
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
8
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
9
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
10
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
11
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
12
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
13
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
14
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
15
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
16
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
17
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
18
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!
19
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
20
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी

प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त; मनपाची दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 2:22 PM

अकोला: शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतरही शहरात खुलेआम प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर सुरू आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचे विघटन होत नसल्यामुळेच शहराच्या कानाकोपऱ्यात प्लास्टिक पिशव्यांचा खच साचल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

अकोला: शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतरही शहरात खुलेआम प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर सुरू आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचे विघटन होत नसल्यामुळेच शहराच्या कानाकोपऱ्यात प्लास्टिक पिशव्यांचा खच साचल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचे विघटन होत नसल्याने विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. शहरातील सर्व्हिस लाइन, सार्वजनिक जागा, नाल्या, गटारे आदी ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा खच साचल्याचे दिसून येते. नाले-गटारांमधील घाण पाणी वाहून जाण्यासाठी प्लास्टिक पिशव्या अडसर ठरत आहेत. ही बाब लक्षात घेता मनपाच्या आरोग्य विभागाने पूर्व, पश्चिम व उत्तर झोन क्षेत्रातील रेल्वेस्थानक परिसरातील शेर ए पंजाब, जैन रेस्टॉरंट, दावत होटल, मुदीना सोनी शॉपी, द कोर्टयार्ड प्रतिष्ठान तसेच गांधी चौक येथील ईगल वाईन बार आदींची तपासणी केली असता, शासनाने बंदी घातलेल्या नॉन वोवन पॉली प्रापीलीन बॅगचा साठा आढळून आला. याप्रकरणी प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, तसेच परिसरात अस्वच्छता पसरविणाऱ्या रेल्वेस्थानक परिसरातील होटल आशीर्वादला एक हजार रुपयाचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर, आरोग्य निरीक्षक शैलेश पावर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.तीन महिन्यांचा कारावास!शासनाने प्लास्टिक पिशव्या वापरणाºया व्यावसायिकांवर पहिल्यांदा पाच हजार रुपये दंडाची तरतूद केली आहे. दुसºयांदा १० हजार रुपये आणि तिसºयांदा वापर करताना आढळल्यास २५ हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांचा कारावास, अशी तरतूद केली. आजपर्यंत मनपा प्रशासनाने थातूरमातूर कारवाया करून वेळ मारून नेल्याचे दिसून येते. आजपर्यंत कारावासाची शिक्षा होईल, अशी एकही कारवाई मनपा किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली नाही, हे येथे उल्लेखनीय. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाPlastic banप्लॅस्टिक बंदी